Shrirampur News SAAM TV
महाराष्ट्र

Shrirampur News: महिलेविषयी अपशब्द वापरणं पडलं महागात! कोर्टाने भाजप नेत्याला ठोठावला तब्बल १ कोटींचा दंड

Shrirampur News: अनुराधा आदिक यांनी दाखल केलेल्या मानाहाणीच्या खटल्यात श्रीरामपूर वरिष्ठ न्यायालयाने चित्ते यांना 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.

Chandrakant Jagtap

>> सचिन बनसोडे

Court Imposed fine of Rs 1 crore on BJP leader for abusive words : महिला नेत्याला अपशब्द वापरणं एका भाजप नेत्याला महागात पडलं आहे. श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्याला तब्बल एक कोटींचा दंड ठोठावला आहे. श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याबद्दल 2021 साली या भाजपचे प्रकाश चित्ते यांनी अपशब्द वापरले होते. या प्रकरणात कोर्टाने त्यांना १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भाजपचे नेते प्रकाश चित्ते यांना राजकीय स्टंट बाजी चांगलीच भोवली आहे. तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा बदलणार असल्यासंदर्भात  केलेले वक्तव्य चित्ते यांच्या अंगलट आले आहे. अनुराधा आदिक यांनी दाखल केलेल्या मानाहाणीच्या खटल्यात श्रीरामपूर वरिष्ठ न्यायालयाने चित्ते यांना 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.

याविषीय अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी चौकात पुतळा बसवण्याच्या प्रकरणातून हा वाद निर्माण झाला होता. त्यावर्षीच्या शिवजयंतीला यावरून आंदोलन झाले होते. त्यामध्ये आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप पदाधिकारी प्रकाश चित्ते यांनी आदिक यांच्याविरोधात आरोप केले होते. पुतळ्याची जागा तत्कालीन नगराध्यक्ष आदिक यांच्याकडून बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चित्ते यांनी केला होता. त्यातून आपली बदनामी झाल्याचा दावा आदिक यांनी दाखल केला होता. (Latest Political News)

यानंतर  शहरात सुरू केलेल्या बदनामी संदर्भात २०२१ मध्ये  तत्कालीन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात ५ कोटींचा मानहाणीचा दावा दाखल केला होता. सदर खटल्यातील पुरावे व साक्षीदार तपासल्या नंतर श्रीरामपूर वरिष्ठ स्तर दिवाणी नाययलायने प्रकाश चित्ते यांनी आदिक यांची मानहानी केल्याचा निष्कर्ष काढत मानहानीपोटी  आदिकांना १ कोटी रुपये देण्याचे आदेश दिल्याची माहिती अनुराधा आदिक यांचे वकील तुषार बी. आदिक यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT