Maharashtra Politics: पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच! जयंत पाटलांच्या दाव्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

Political News: जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
jayant patil
jayant patil saam tv

Jayant Patil News: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण विविध कारणांनी चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. (Latest Marathi News)

jayant patil
Karnataka Election : मोठी बातामी! कर्नाटकात 'व्होट फ्रॉम होम' मोहिमेला सुरूवात; निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय

अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील एका कार्यक्रमामध्ये आपण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याची इच्छा व्यक्त केली होती. तर जयंत पाटील (Jayant Patil) यांचं नाव देखील मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेमध्ये आहे.अशातच आता जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल येताच जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. (Maharashtra Politics)

jayant patil
Mumbai Crime: शेजाऱ्यांसोबतचा वाद जीवावर बेतला! बाप-लेकाकडून महिलेवर अंधाधुंद गोळीबार; घटना CCTVत कैद

नेमकं काय म्हणाले पाटील?

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल असं विधान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलेला आहे. ते काल रात्री कराड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे विधान करून आघाडीतील नेत्यांची झोप उडवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com