radhakrishna vikhe patil, balasaheb thorat, Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News saam tv
महाराष्ट्र

Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News : 'गणेश' च्या निवडणुकीत कोल्हेंच्या भूमिकेमुळे विखेंची अडचण वाढली; थाेरात गटात चैतन्य

येत्या 17 जूनला मदत हाेणार आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील श्री गणेश सहकारी साखर कारखाना (Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४५ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) विरुद्ध माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) असा सामना पुन्हा एकदा गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला बघायला मिळणार आहे. (Maharashtra News)

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने थोरातांना समर्थन दिल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी एकत्रितपणे विखें यांच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोन वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र

थोरात - कोल्हे एकत्र आल्याने विखे पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून या संबंधी खासदार सुजय विखे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सहकारात पक्षीय राजकारण नसते तर विचारांची लढाई असते. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, नेते आपआपला निर्णय घेत असतात. बाजार समितीतही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या पातळीवर निर्णय घेतले मात्र आमच्यावर आरोप करण्यात आले. गणेश कारखान्याच्या निमित्ताने आमच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आल्याने आम्हाला काही अडचण येणार नसल्याचे सुजय विखे यांनी नमूद केले.

विराेधक सरसावले

गणेश सहकारी साखर कारखाना गेल्या आठ वर्षांपासून विखे पाटलांच्या प्रवरा कारखान्याकडे कराराने चालवण्यासाठी होता. मात्र आता निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच सहकार विभागाने करार वाढवून पुन्हा पाच वर्षांसाठी हा कारखाना विखे पाटलांकडे चालवण्यासाठी दिल्याने विरोधकांनी यावर टीका करत आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि आमचे संचालक मंडळ कारखान्यावर निवडणूक येईल असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

१७ जूनला मतदान

दरम्यान या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे काही उमेदवार देखील आपले नशीब आजमावत आहेत. १७ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून विखे थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT