NCP News : बंधू ऋषिकांतचा निर्णय शशिकांत शिंदेंच्या लागला जिव्हारी, राजकीय षडयंत्रास देणार चाेख उत्तर

आमदार शशिकांत शिंदे हे सांगली दाै-यावर आले हाेते.
ncp leader sharad pawar, mla shashikant shinde, satara ,sangli, cm eknath shinde
ncp leader sharad pawar, mla shashikant shinde, satara ,sangli, cm eknath shindesaam tv
Published On

Sangli News : तुम्ही माझे घर फोडले, मीही शिंदे - फडणवीस युती तोडण्यासाठी रान तापवतोय पण आम्ही प्रयत्न करण्याऐवजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार पडायला मंत्रिमंडळाचा विस्तार पण कारणीभूत होऊ शकतो असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (mla shashikant shinde) यांनी व्यक्त केले. ते सांगली (sangli) येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मेळाव्याच्या (rashtravadi congress melava) निमित्ताने आले हाेते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच काेसळेल असे भाकित केले. (Maharashtra News)

ncp leader sharad pawar, mla shashikant shinde, satara ,sangli, cm eknath shinde
Shivrajyabhishek Sohala 2023 : छत्रपतींची पालखी पाेहचताच 'तुमचं आमचं नातं काय ?, जय जिजाऊ जय शिवराय' घाेषणांनी राजसदर दुमदुमला (पाहा व्हिडिओ)

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले सरकार मधील बरेच लोकं नाराज आहेत. त्यामुळे आम्हांला हे सरकार पाडण्यासाठी काहीच प्रयत्न करावा लागू नये अशीही परिस्थिती येऊ शकते. कारण तुम्ही आमच्याकडे या सरकार बनवू असे सांगताना 50 खोक्याबरोबच अनेक आमिषे दाखविली गेली होती. ती जर पूर्ण झाली नाहीत तर त्याचा फटका देखील या सरकारकला बसू शकतो.

ncp leader sharad pawar, mla shashikant shinde, satara ,sangli, cm eknath shinde
VishalGad News : शिवप्रेमींनाे ! विशाळगडाबाबत पुरातत्त्व विभागानं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

शिंदे- भाजपने आज माझ्या भावाला पक्षात घेऊन माझे घर फोडले आहे. मी देखील लवकरच शिंदे - फडणवीस युती तोडून दाखवतो असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. मात्र आम्ही प्रयत्न करण्याऐवजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार पडायला मंत्रिमंडळाचा विस्तार पण कारणीभूत होऊ शकतो अशीही शक्यता आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली.

ncp leader sharad pawar, mla shashikant shinde, satara ,sangli, cm eknath shinde
Satara Crime News : दारूच्या नशेत तर्रर्र... मुख्यालयातील पाेलिस निरीक्षकाला पब्लिकने बेदम चाेपला, व्हिडिओ व्हायरल झाला ना भाऊ

त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करायची गरजच पडणार नाही असे शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. ते म्हणाले माझे घर फोडले त्या भाजप आणि शिंदेची युती संपवण्याचे मी आव्हान स्वीकारले आहे. यासाठी माझ्यापरीने या युतीविरोधात रान तापवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचेही आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार शशिकांत शिंदे यांच्या ते जिव्हारी लागल्याचे आज स्पष्ट त्यांच्या बाेलण्यातून जाणवले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com