- ओंकार कदम
Satara News : फलटण येथे पोलीस निरीक्षकाने रात्री मद्यधुंद अवस्थेत फलटण (phaltan) शहरातील दत्त नगर परिसरात एकास गाडी धडकवल्याने गोंधळ उडाला. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरल्या नंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या अपघातात पोलीस निरीक्षकाला नाकाला दुखापत झाल्याची प्रथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातात संबंधित इसमाला गाडी धडकल्यामूळे दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या अधिकाऱ्याच्या गाडीमध्ये दिवा आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्याचा व्हिडिओ सध्या सातारा जिल्ह्यात व्हायरल हाेत आहे. (Maharashtra News)
या घटनेबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - (phaltan) शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दत्तनगर येथे मुधोजी महाविद्यालयाच्या वळणावर त्यांनी एकास धडक दिली. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. या वेळी अधिकारी दारूच्या नशेत तर्रर्र असताना गाडी चालवत असल्याचा आरोप घटनास्थळावरून होत आहे. लोकांना गाडीत दारूच्या बाटल्या देखील आढळल्या.
एका पोलिस अधिकाऱ्याकडून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा प्रकार घडल्याचा आराेप करत काहींनी त्याचा कारसह व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ साम टीव्हीच्या देखील हाती लागला आहे.
दरम्यान धडक दिल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची माेठी जमल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. या वेळी अधिकारी दारूच्या नशेत तर्रर्र असताना गाडी चालवत असल्याचा आरोप घटनास्थळावरून होत आहे. लोकांना गाडीत दारूच्या बाटल्या, गाडीवर लावण्याचा दिवा व पोलिस असे लिहिलेला बोर्ड दिसून आला.
या अपघातामधील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी संबंधित अधिका-यास जमावाने चांगलाच चोप दिल्याचे बाेलले जात आहे. संबंधित अधिकारी हे फलटण येथून बदलीहून सातारा येथील मुख्यालयात गेले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.