Buldhana News : एसटी महामंडळ एसटीचा 75 वा वर्धापन दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान हे हाेत असतानाच बसमधून धुर निघत असताना घाबरलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी संकटकाळी खिडकी उघडून उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे. त्याची चर्चा राज्यभरात हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)
बुलढाणा आगाराची बस बुलढाणा येथून अजिंठा जाण्यासाठी निघाली. या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी बसलेले होते. ही बस देऊळघाट जवळ पोहोचली असता, त्या बस मधून अचानक मोठा धूर निघू लागला. ही बाब देऊळघाट येथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली व बसमधील प्रवाशांना बाहेर निघण्यासाठी संकटकाळी खिडकी उघडली.
त्यामधून अनेक प्रवासी उड्या मारून बाहेर निघाले. बसमधील इंजिन नादुरस्त असल्याने धुर निघत असल्याचे चालकाने सांगून थोड्या वेळानंतर एसटी चालकाने पुन्हा प्रवाशांना बसमध्ये बसविले. त्यानंतर ही बस मार्गस्थ झाली.
नादुरुस्त बस रस्त्यावर का आणल्या जातात ?
दरम्यान बुलढाणा डेपो मधील अनेक बसेस नादुरुस्त आहे. प्रवासी सेवा खंडित होऊ नये म्हणून उपलब्ध असलेली बस नाइलाजस्व चालकांना रस्त्यावर चालवण्यासाठी दिली जात आहे. मात्र अशात जर मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.