Nagar News : भाविकांनाे ! नगर शहरातील 16 मंदिरात 'ड्रेस कोड' लागू

नगर जिल्ह्यातील मंदिरांत दोन महिन्याच्या आत वस्त्र सहिंता लागू केली जाणार आहे.
dress code for devotees in 15 temples of nagar declares maharashtra mandir mahasangh
dress code for devotees in 15 temples of nagar declares maharashtra mandir mahasanghsaam tv
Published On

- सुशील थोरात

Nagar News : नगर शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरासह अन्य 16 मंदिरात आजपासून (शनिवार) ड्रेस कोड बाबत नियम करण्यात आले आहेत. नगर शहरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. भाविकांनी अंग प्रदर्शन न करणारे उत्तेजक, बर्मुडा पॅन्ट, फॅशनेबल जीन्स पॅन्ट, पायावर फाटलेल्या डिझायन्सचे कपडे परिधान करणे टाळावे शक्यता परिधानच करू नयेत असे महाराष्ट्र मंदिर महासंघाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

dress code for devotees in 15 temples of nagar declares maharashtra mandir mahasangh
Shiv Sena आक्रमक, Last Warning देत शिवसैनिकांनी संजय राऊतांना हात पाय ताेडण्याची दिली धमकी

राज्यामध्ये विविध मंदिरांमध्ये ड्रेस कोड बाबत सक्ती केली जात असताना या ड्रेस कोडच्या सक्ती बाबत वादही होऊ लागले आहेत. काही ठिकाणी ड्रेस कोड वरून मोठे राजकारणही पेटले असून विविध मंदिरांनी ड्रेस कोड सक्तीही केली आहे. तर काही मंदिरांनी ड्रेस कोड सक्ती करून पुन्हा ती मागेही घेतल्याच्या घटना सुरू आहेत.

dress code for devotees in 15 temples of nagar declares maharashtra mandir mahasangh
SSC Result 2023 : संसाराचा गाडा हाकत सख्या बहिणींनी दहावीची परिक्षा दिली, निकाल हाती येताच मोरे भगिनींचे डाेळे पाणावले

नगर शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात आज पासून ड्रेस कोड बाबत नियम करण्यात आले आहेत. नगर शहरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. तसेच शहरातील इतर छोट्या-मोठ्या सोळा मंदिराही ड्रेस कोड बाबत नियमावली करणार असून या नियमावलीचे उद्यापासून सक्तीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

dress code for devotees in 15 temples of nagar declares maharashtra mandir mahasangh
VishalGad News : शिवप्रेमींनाे ! विशाळगडाबाबत पुरातत्त्व विभागानं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

ड्रेस कोड सक्ती केलेले मंदिरे

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर बुरानगर ,श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा, शनि मारुती मंदिर दिल्ली गेट, शनि मारुती मंदिर झेंडीगेट,तुळजाभवानी माता मंदिर सबजेल चौक,श्री गणेश राधा कृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर पवन नगर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वणी नगर या मंदिरात उद्या पासून आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरा मध्ये दोन महिन्याच्या आत वस्त्र सहिंता लागू होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. ('Dress Code' For Devotees Imposed At 16 Temples In Nagar)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com