Shravan Saam Tv
महाराष्ट्र

Shravan Month: ९ किलोमीटरची पायी यात्रा, न थांबणारी भक्तीची कावड; काय आहे श्रावणातील ही अनोखी परंपरा?

Dharashiv News: धाराशीवमध्ये अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात श्रावण महिन्यात एक परंपरा पाळली जाते. यामध्ये दोन पुजारी खांद्यावर कावड घेऊन ९ किलोमीटरची पदयात्रा करतात.

Siddhi Hande

आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. निसर्ग हिरवाईने नटलेला दिसत आहे. प्रत्येकाच्या मनात आज भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिना भगवान शंकराच्या आराधनेचा, पूजा आणि व्रतांचा आहे. याच महिन्यात अनेक सण असतात. या महिन्यात केलेल्या उपासनेमुळे तुम्हाला चांगले फळ मिळते, असं म्हटलं जाते.दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात एक अशी परंपरा जपली जाते. ज्यात संपूर्ण श्रावण महिना दोन पुजारी कावड घेऊन ९ किलोमीटरची पदयात्रा केली जाते.

अणदूरचे श्री खंडोबा मंदिर हे जागृत तीर्थक्षेत्र आहे. येथे जेजुरीच्या खंडोबाच्या मूर्तीच्या आसनाखालील महादेवाची पिंड विराजमान आहे.खंडोबा हादेखील शिव शंकराचा अवतार आहे. याच नात्याने धाराशिवमध्ये एक परंपरा जपली जाते. धाराशिवमध्ये नऊ किलोमीटरची पायी याऊा केली जाते. भक्तीची कावड घेऊन ही यात्रा केली जाते.

श्रावणाच्या पहिल्याच दिवश सुंदर पाऊस पडत आहे. याच दिवशी सकाळी खाद्यांवर कावड घेऊन दोन पुजारी पदयात्रा करत निघतात. यावेळी अणदूरचे पूजारी रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे हे पदयात्रेसाठी निघाले आहेत.

श्रावणात दर दिवशी हे दोन्ही पुजारी कावड घेऊन पदयात्रा करतात. प्रत्येक दोन अशा चार घागरी असलेल्या कावड घेऊन निघतात.अणदूरपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागझरी येथे ही कावड घेऊन जातात. हे नागझरी म्हणजे मैलारपूर (नळदुर्ग) येथील खंडोबा मंदिराजवळील डोंगरातील एक सिद्ध स्थान आहे. येथील होमकुंडातील पाणी वर्षभर गरम असते आणि १९७२ च्या महाभयंकर दुष्काळातही हे कुंड आटले नाही, अशी येथील ख्याती आहे.

अणदूर ते नागझरी, तेथून मैलारपूर (नळदुर्ग) आणि परत अणदूर, असा रोजचा नऊ ते दहा किलोमीटरचा पायी प्रवास करतात. या यात्रेचा एक नियम म्हणजे एकदा तुम्ही कावड खांद्यावर घेतली की ती खाली ठेवायची नाही.पाण्याने भरलेल्या या घागरी घेऊन जायचे दिव्य हे दोन पुजारी करतात.

पुजारी नागझरीला पोहोचतात, तेथे स्नान करून होमकुंडातील पवित्र पाण्याने घागरी भरतात. त्यानंतर ते मैलारपूरच्या खंडोबा मंदिरात जातात, जिथे एका घागरीतील जलाने महादेवाला अभिषेक केला जातो. यानंतर रिकाम्या घागरीत पुन्हा नदीतील पाणी भरुन परतीचा प्रवास केला जातो. संपूर्ण श्रावण महिना ही पदयात्रा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत काढता येणार

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

SCROLL FOR NEXT