Nanded: अपघाती निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना गावकऱ्यांचा आधार; व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून जमा केले १ लाख ४३ हजार

Nanded Villagers Help 1 lakh 43 Thousand Rupees: नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील सालेगाव गावात एक नवीन मोहिम राबवण्यात आली आहे. या माध्यमातून अपघातात निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे.
Nanded
NandedSaam Tv
Published On
Summary

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात

अपघातानंतर तरुणाच्या कुटुंबाला १ लाखांची मदत

नांदेडच्या गावकऱ्यांचा अनोखा उपक्रम

सध्याच्या जगात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपलं आयुष्य मनमोकळेपणाने जगावं, असं म्हणतात. दिवसाला अनेक अपघात होतात. त्यात कित्येक लोकांचे जीव जातात. त्यांच्या कुटुंबाचे झालेले नुकसान तर आपण भरुन काढू शकत नाही. परंतु आपण त्यांना आर्थिक मदत तर करुच शकतो. असंच काहीसं नांदेडच्या एका गावातील नागरिकांनी केलं आहे.

Nanded
Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

अपघातात निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना गावकऱ्यांनी आधार दिला. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथील उत्तम क्षीरसागर या तरुणाचे काही दिवसापूर्वीच बस अपघातात निधन झाले.उत्तम क्षीरसागर या तरुणाचे अपघातात निधन झाल्यानंतर सालेगाव येथील छत्रपती संभाजी राजे या व्हाट्सअप ग्रुपच्या मित्र मंडळांनी तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रुपच्या माध्यमातून केले.

काही तासातच छत्रपती संभाजी राजे या व्हॉट्सअप ग्रुप वर एक लाख 43 हजार 600 रुपयाची रक्कम जमा झाली. अपघातात निधन झालेल्या उत्तम क्षीरसागर या तरुणाला आई-वडील पत्नी आणि एक वर्षाची मुलगी आहे. घरातील सर्वात लहान आणि कमावता तरुण गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Nanded
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

दरम्यान, त्याच्या नक्षत्रा या एका वर्षाच्या मुलीच्या नावाने 01 लाख 40 हजार रुपये रक्कम जमा झाली. याचा गावकऱ्यांनी विमा काढला. मुलीच्या नावाने विमा काढून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असंच जर सर्वांनी आपल्यावतीने थोडी मदत जरी केली तरी अनेक कुटुंबाना आधार मिळेल.

Nanded
Success Story: अपघाताने आयुष्यचं बदललं, मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; वैभव छाबरा यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com