Surabhi Jayashree Jagdish
कॉलेजमधील तरुण मुली इंटरनेटवर अनेक प्रकारच्या गोष्टी शोधतात.
यामध्ये त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, वैयक्तिक आणि मनोरंजक गरजा पूर्ण करतात.
कॉलेजमधील मुली अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती, नोट्स, संशोधन पेपर, ऑनलाइन ट्यूटोरियल्स, आणि विविध विषयांवरील स्पष्टीकरणे शोधतात.
भविष्यातील करिअरसाठी योग्य पर्याय, विविध नोकरीच्या संधी, इंटर्नशिप, उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांची तयारी आणि परदेशातील अभ्यासाचे पर्याय याबद्दल तरूण मुली माहिती घेतात.
नवीन भाषा शिकणे, किंवा विशिष्ट कोर्ससाठी आवश्यक असलेले कौशल्यं यांचा देखील त्या शोध घेतात.
ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज, चित्रपट आणि टीव्ही शो यांच्याबद्दलही त्या सर्च करतात.
काही प्रमाणात ऑनलाइन डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियाद्वारे नवीन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करणं याबाबतही मुली इंटरनेटवर सर्च करतात.