nagpur viral video news saam TV News Marathi
महाराष्ट्र

Nagpur Video : नागपूरमध्ये माणुसकीचा अंत, पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेहण्याची वेळ, पतीची हतबलता कॅमेऱ्यात कैद

नागपूर-जबलपूर महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल समोर आलाय.

Namdeo Kumbhar

  • नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघातात ग्यारसी अमित यादव यांचा मृत्यू

  • मदतीसाठी कुणीही थांबले नाही, पतीने मृतदेह दुचाकीला बांधला

  • मोरफाटा परिसरात ट्रकच्या कटमुळे अपघात

  • महामार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेयो हॉस्पिटलला पाठवला

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Husband carries wife’s dead body on bike after Nagpur accident : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला लाज वाटावी अशी घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने दुचाकीवर बांधून नेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृतक महिलेचे नाव ग्यारसी अमित यादव असे आहे. तिचा पती अमित भुरा यादव (वय ३५) याने हतबल होऊन हा निर्णय घेतला. अपघातात पत्नीचा मृत्यू झाला, पण मदतीसाठी कुणीच धावले नाही, त्यामुळे दुचाकीवर मृतदेह नेहण्याची वेळ आली आहे.

देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात ही घटना घडली. अमित आणि ग्यारसी रक्षाबंधनानिमित्त मोटारसायकलवरून लोणारा येथून करणपूरला जात होते. मागून वेगाने आलेल्या ट्रकने कट मारल्याने ग्यारसी खाली पडली आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन तिचा मृत्यू झाला. अमितने हात जोडून वाहनचालकांना मदतीची याचना केली, परंतु कोणीही थांबले नाही. अखेर हताश होऊन त्याने पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून मध्यप्रदेशातील सिवनी येथील घरी नेण्याचा निर्णय घेतला.

अमित आणि ग्यारसी मागील १० वर्षांपासून नागपूरच्या लोणारा येथे राहत होते. मृतदेह घेऊन जाताना काही जणांनी अमितला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु भीतीने तो थांबला नाही. अखेर महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Travel : इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत करा किल्ल्यावर भटकंती, 'हे' ठिकाण यादीमध्ये पाहिजेच

Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

SCROLL FOR NEXT