Family Claims Fake Post-Mortem Pressure on Female Doctor Saam
महाराष्ट्र

'ती फक्त तळहातावर सुसाईड नोट लिहून...' डॉक्टर तरूणीच्या भावाला वेगळाच संशय

Family Claims Fake Post-Mortem Pressure on Female Doctor: सातारा डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईक अन् चुलत भावाकडून नवीन धक्कादायक आरोप. सुसाईड नोटबाबत नेमकं काय म्हणाला ?

Bhagyashree Kamble

सातारा येथील बलात्काराचा आरोप करून आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरूणीच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडत आहेत. डॉक्टर तरूणीवर पोलीस तसेच राजकीय दबाव असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एक वर्षहून अधिक काळ महिला डॉक्टरवर खोटे पोस्टमॉर्टम आणि फिटनेस रिपोर्ट तयार करण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती मृत तरूणीच्या चुलत भावाने दिली.

मृत डॉक्टर तरूणीच्या चुलत भावाने धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी देखील सहभागी असल्याचा दावा डॉक्टर तरूणीच्या भावाने केला आहे. चुकीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि बनावट फिटनेस प्रमाणपत्र तयार करण्यासाठी दबाव आणला जात होता, असं चुलत भावाने म्हटलंय.

चुलत भावाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा बहिणीचा मृत्यू झाला, तेव्हा सकाळी ६ वाजेपर्यंत कुणीही शवविच्छेदन करण्यासाठी उपस्थित नव्हते. शिवाय आमच्या अनुपस्थितीत बहिणीचा मृतदेह रूममधून रूग्णालयात आणण्यात आला, हे कुटुंब उपस्थित असताना करायला हवे होते', असं डॉक्टर तरूणीच्या चुलत भावाने म्हटलंय.

चुलत भावाने आणखी सुसाईड नोट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 'माझी बहीण तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल सतत लिहित होती. तिनं याआधी चार पानांचे तक्रार पत्र लिहिले. ती फक्त तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करू शकत नाही', असा संशय डॉक्टर तरूणीच्या चुलत भावाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT