UPSC Aspirant Strangled and Burnt
UPSC Aspirant Strangled and BurntSaam Tv

'माझे प्रायव्हेट व्हिडिओ..' गर्लफ्रेंडकडून UPSCच्या विद्यार्थ्याची हत्या; Ex-बॉयफ्रेंड सिलिंडरवाल्याची मदत घेऊन काटा काढला

UPSC Aspirant Strangled and Burnt: दिल्लीतील गांधी विहार परिसरात UPSC विद्यार्थी रामकेश मीणा याची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.
Published on

दिल्लीतील गांधी विहार परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आलीये. या प्रकरणी रामकेशची लिव्ह इन पार्टनर गर्लफ्रेंड आणि दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींनी आधी तरूणाची गळा दाबून निर्घृण हत्या केली. नंतर खोलीला आग लावली. पोलीस चौकशीत हे प्रकरण समोर आलं.

रामकेश मीणा (वय वर्ष ३२) असे युपीएससीच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अमृता चौहान (वय वर्ष २१) असे महिला आरोपीचे नाव आहे. अमृतासोबत रामकेश लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. अमृता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड संदीप कुमार आणखी एका साथीदारांनी मिळून रामकेशची हत्या केली. तिघे आरोपी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहेत.

UPSC Aspirant Strangled and Burnt
साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; दुसऱ्या आत्महत्येचा संबंध उघड, पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. आग विझल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रामकेशचा जळालेला मृतदेह बाहेर काढला. सुरूवातीच्या तपासात हा अपघात असल्याचं आढळून आलं. परंतु, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन डेटावरून या प्रकरणातील गूढ आणखी वाढत गेलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना रात्रीच्या वेळेस दोन तरूण आणि एक तरूणी इमारतीत प्रवेश करताना दिसत आहे. नंतर काही वेळातच निघून जाताना दिसत आहे.

UPSC Aspirant Strangled and Burnt
'...तर डॉक्टर तरूणीचे प्राण वाचले असते'; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

पोलिसांनी २ तरूण आणि तरूणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, अमृताने गुन्हा कबूल केला. तिनं रामकेशकडे आपले काही खासगी फोटो असल्याचं सांगितलं. जे डिलीट करण्यास रामकेश नकार देत होता. त्यानंतर अमृताने एक्स बॉयफ्रेंड आणि साथीदाराच्या मदतीने रामकेशच्या हत्येचा कट रचला.

अमृताचा एक्स बॉयफ्रेंड हा सिलिंडरवाला होता. तिघांनी मिळून आधी रामकेशचा गळा दाबला. नंतर रामकेशच्या अंगावर तेल टाकून गॅस सिलिंडरचा स्फोट केला. नंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपींकडून काही साहित्य जप्त केले आहेत. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com