

'वेळीच मदत घेतली असती तर जीव वाचला असता'
महिला पोलीस अधिकारी नेमकं काय म्हणाले?
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू.
साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी प्रशांत बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाबाबत साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली. 'संबंधित डॉक्टर तरूणीनं वेळीच कुणाला सांगितलं असतं, तर त्यांचे प्राण वाचले असते',असं ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून कडूकर ठाण मांडून बसले आहेत. सध्या त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या मुळाशी तपास सुरू असल्याची माहिती कडूकर यांनी दिली.
या प्रकरणाबाबत प्रशांत कडूकर म्हणाल्या, 'साताऱ्यातील ही घटना अतिशय दुर्देवी आहे. संबंधित डॉक्टर तरूणीला जर त्रास झाला होता तर, त्यांनी वेळीच कुणाला तरी याबाबत माहिती द्यायला हवी होती. नातेवाईक किंवा मित्राला त्यांनी माहिती द्यायली हवी होती. मृत्यूपूर्वी त्यांनी कुणालातरी सांगायला हवं होतं. त्यांनी आधी सांगितलं असतं तर, कदाचित तरूणीचे प्राण वाचले असते', अशी माहिती पोलीस कडूकर यांनी दिली.
डॉ़क्टर तरूणीनं वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केली असावी, असा संशय यावेळी त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी नामांकित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तरूणी एकटीच हॉटेलमध्ये गेल्याचं आढळून आलं आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.