बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाकडून आत्मसमर्पण; डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात बदने नेमकं काय म्हणाले?

Satara Phaltan Doctor case: फरार पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Satara Phaltan Doctor case
Satara Phaltan Doctor caseSaam
Published On

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर तरूणीनं आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी महिलेनं हातावर सुसाईड नोट लिहिली होती. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरूणीनं पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांच्या नावाचा उल्लेख केला होता. दोघांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचं समोर आलं आहे. काल प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, शनिवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी आत्मसमर्पण केलं.

गेल्या काही तासांपासून गोपाल बदने फरार होता. पोलीस त्यांच्या मागावर होते. गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात आढळलं होतं. मात्र, शनिवारी रात्री गोपाळ बदने यांनी आत्मसमर्पण केलं. ते स्वत: हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Satara Phaltan Doctor case
Satara Crime : 'दादा' म्हणायची, त्याला प्रपोजही केलं, महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रूग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी गोपाळ बदने यांनी पहिल्यांदाच माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी प्रामाणिक व्यक्ती आहे. कोर्ट जो काही निर्णय देईल, त्यावर माझा विश्वास आहे. माझा कोर्ट आणि पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे', असं गोपाल बदने म्हणाला.

Satara Phaltan Doctor case
आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? टोकाचं पाऊल उचलण्यामागचं धक्कादायक कारण समोर

प्रशांत बनकरला पोलिसांनी शनिवारीच अटक केली होती. त्याला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टानं सुनावणीनंतर बनकरला ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. आता दोघांच्या तपासातून पोलिसांना नेमकी कोणती नवीन माहिती मिळते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com