Hingoli cancer suspected women 2025 saam tv
महाराष्ट्र

Hingoli cancer : धक्कादायक! हिंगोलीत आढळल्या 13 हजार कॅन्सरच्या संशयित महिला; स्तन, गर्भाशयाच्या कॅन्सर असल्याचं तपासातून समोर

Hingoli cancer suspected women 2025: हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी मोहिम राबवली. या तपासणीअंती एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून, ग्रामीण भागातील अनेक महिलांमध्ये स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं आढळली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढत असून हिंगोलीसारख्या ठिकाणी देखील याचे रूग्ण वाढताना दिसतायत. नुकतंच हिंगोली मध्ये 13000 महिला रुग्ण कॅन्सरबाबत संशयास्पद आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीये. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याबाबत सकारात्मक पाऊल उचलत आरोग्य विभागाला महिलांच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले होते, या मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांनी संजीवनी आरोग्य अभियान असं नाव देण्यात आलं होतं.

दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने या महिलांची प्राथमिक तपासणी केली. यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होत असल्याचं समोर आलं आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितलं की, आशा वर्कर्सना आम्ही ट्रेनिंग देऊन जिल्ह्यातील महिलांना कॅन्सरची लक्षणं आहेत याबाबत तपासणी करण्यास सांगितलं होतं. यामध्ये १३ हजार महिलांना काहीशी लक्षणं दिसून आली आहेत. लक्षणं आढळलेल्या महिलांची एक यादी केली असून या महिलांची पुढील तपासणी होणार आहे.

तालुका स्तरावर होणार स्क्रीनिंग

संशयित असलेल्या आता या सर्व महिलांची तालुका स्तरावर स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर या महिला कॅन्सर बाधित आहेत किंवा नाही हे स्पष्ट होणार असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय. धक्कादायक म्हणजे स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांना होत असल्याचा देखील या तपासण्यामधून स्पष्ट झालं आहे.

महिलांसाठी कर्करोग सावधगिरी लस

कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर शिबिरं आयोजित करावीत. त्यासाठी आठ दिवसात रूपरेषा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

SCROLL FOR NEXT