Surabhi Jayashree Jagdish
जगात स्तनाचा कॅन्सर वाढत असून या कॅन्सरमध्ये दिसून येणारं पहिलं लक्षणं तुम्हाला माहितीये का?
स्तनामध्ये गाठ दिसून येणं हे स्तनाच्या कॅन्सरचं पहिलं लक्षण आहे. त्याचप्रमाणे स्तनातून रक्त येणं आणि काही द्रव बाहेर येणं ही लक्षणं मानली जातात.
खाज सुटणं, त्वचा सोलणं किंवा फुगणे ही स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत.
काखेत सूज किंवा गाठ जाणवणे हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे.
स्तनाला स्पर्श केल्यावर वेदना होणं हे देखील स्तनाच्या कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे.
स्तनाचा आकार बदलणे हे देखील एक दृश्य लक्षण आहे.
WHO च्या मते, भविष्यात 20 पैकी 1 महिलेला स्तनाचा कॅन्सरचं होऊ शकतो.