Surabhi Jayashree Jagdish
प्रोस्टेट-स्पेसिफिक एंटीजन (PSA) हे प्रोस्टेट ग्रंथीमध्ये बनवलेलं प्रोटीन आहे. रक्तातील PSA चे प्रमाण मोजण्यासाठी प्रोस्टेट-स्पेसिफिक एंटीजन चाचणी केली जाते.
संपूर्ण ब्लड टेस्ट पेशींचे प्रकार मोजण्यास मदत करते. मात्र तुम्हाला माहितीये का कॅन्सर ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत?
किडनी फंक्शन टेस्ट (KFT) ही रक्त आणि लघवीची चाचणी असते. ही चाचणी किडनीचे कार्य आणि आरोग्य जाणून घेण्यासाठी केली जाते.
CA 15-3 चाचणी कर्करोग एंटीजन 15-3 (CA 15-3) ची पातळी मोजते. ही ट्यूमर मार्कर टेस्च आहे. या चाचणीद्वारे ब्रेस्ट कॅन्सर शोधला जातो.
Carcinoembryonic antigen (CEA) हे एक प्रोटीन असून ज्याचं प्रमाण CEA चाचणीद्वारे मोजलं जातं. ही चाचणी कोलोरेक्टल कॅन्सरसाठी केली जाते.
CA-125 टेस्ट गर्भाशयाच्या कॅन्सरवरील उपचार किती प्रभावी आहे किंवा कॅन्सर पुन्हा झाला आहे का हे सांगते.
CA 72.4 चाचणी, जी ट्यूमर मार्करची पातळी मोजते. ही टेस्ट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरची पातळी जाणून घेण्यासाठी केली जाते.