Illegal Liquor and Tobacco Sold Freely in Mangala Lakshadweep Train Saam
महाराष्ट्र

धक्कादायक! एक्स्प्रेसमध्ये पाणी बिस्किट नव्हे.. दारू, गुटखा अन् अंमली पदार्थांची विक्री, VIDEO व्हायरल

Illegal Liquor and Tobacco Sold Freely in Mangala Lakshadweep Train: रत्नागिरी स्टेशनदरम्यान एक्स्प्रेसमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

Bhagyashree Kamble

बऱ्याचदा लोकल किंवा एक्स्प्रेसमध्ये फेरीवाले किंवा खाद्यपदार्थ विकणारे आपण पाहिलेच असतील. प्रवासी देखील त्यांच्याकडून वस्तू घेतात. मात्र, मंगला लक्षदीप एक्स्प्रेसमधून एक वेगळंच चित्र समोर आलं आहे. मंगला लक्षदीप ट्रेन क्रमांक -12617 रत्नागिरी स्टेशन दरम्यान आज सकाळी खुल्या दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. याचे व्हिडिओ आता प्राप्त झाले असून, ट्रेनमध्ये टीसी उपस्थित असताना आणि रेल्वे पोलीस गस्तवर असताना अशी उघड विक्री होते कशी? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधीही या ट्रेनमध्ये गुटखा, सिगारेट आणि अन्य अंमली पदार्थांची सर्सा विक्री होत असल्याच्या तक्रारी मिळत होत्या. दरम्यान, अशा प्रकारे उघडपणे विक्री होत असल्याने काही कर्मचाऱ्यांचा या व्यवहाराला पाठिंबा असल्याचा संशय अधिक बळावतो आहे.

कोकण रेल्वे महामार्गावर अंमली पदार्थांची विक्री

कोकण रेल्वे महामार्गावर यापूर्वी सिगारेट, गुटखा यांसारख्या पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून आलेले आहे. दरम्यान, नागरिकांनी या विषयाची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

या प्रकरणाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी पनवेलच्यादरम्यान गुटखा विक्री करणारे दिसतात. दरम्यान, अशा लोकांना पोलीस ताब्यात का घेत नाही? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. एक्स्प्रेसमध्ये चोरी होत असल्याचा आरोपही काही प्रवाशांनी केला आहे.

फेरीवाल्यांना लीगल परवानगी देऊन पास देण्यात यावेत

एक्स्प्रेस किंवा लोकलमध्ये फेरीवाले दिसतात. तसेच इतर खाद्यपदार्थ विकणारे दिसतात. मात्र, या फेरीवाल्यांकडून रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी हप्ते वसूली करत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. दरम्यान, प्रवाशांनी 'हे फेरीवाले स्थानिक असून, त्यांना लीगल पास देण्यात यावे', अशी मागणी केली आहे. 'त्यांना परवानगी देऊन कायदेशीर व्यवसाय करण्याची संधी द्यावी', अशी देखील मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : किचन सिंकमध्ये घाण साठते, घरभर दुर्गंध येतो? मग या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Pune : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ब्लॅक स्पॉटवर स्कूल बस आणि कारची धडक

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

Instant Noodles: आठवड्यातून दोन वेळा नूडल्स खाताय? आताच व्हा सावध , अन्यथा 'या' गंभीर आजाराचा वाढेल धोका

SCROLL FOR NEXT