Crime Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! पुण्यात राहत्या घरासमोर भावाला संपवलं, कारण फक्त एवढंच...

Pune brother crime case: दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचं रूपांतर भांडणात झालं. भांडण झाल्यानंतर एका भावानं सख्ख्या भावाची हत्या केली.

Bhagyashree Kamble

दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचं रूपांतर भांडणात झालं. भांडण झाल्यानंतर एका भावानं सख्ख्या भावाची हत्या केली. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात घडली आहे. घरासमोरच ही हाणामारी झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून एका भावाने सख्ख्या भावाची हत्या केली आहे. दोन भावांमध्ये शेवग्याच्या शेंगांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जोरदार वाद झाला, वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

दोघा सख्ख्या भावांमध्ये वाद घरासमोरच झाला. अशी माहिती काही घराशेजारील नागरीकांनी दिली. सुभाष चासकर यांनी केलेल्या बेदम हाणामारीत चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झाला. सुभाष चासकर हे अग्निशमन दलातील रिटायर्ड कर्मचारी असल्याची माहिती आहे. चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

चंद्रकांत चासकर यांचा मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपाल करीत असून, शुल्लक कारणावरून हत्या झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT