Crime Saam tv
महाराष्ट्र

Shegaon Crime : काळिमा फासणारी घटना! शेगावात दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार, मंदिराच्या परिसरात काळे कृत्य

Shegaon rape case latest update : शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून घटनेमुळे शेगावमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Namdeo Kumbhar

Gajanan Maharaj temple news : शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर नराधमाने बलात्कार केला आहे. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या लॉजवर नेऊन तरूणीवर अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण शेगाव शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शेगाव मंदिर परिसरात संताप व्यक्त केला जात असून नराधमाला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जातेय.

मंगळवारपासून संत गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे राज्य भरातून शेगाव शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी आहे. पण शेगावमधील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका १९ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन तरुणाने आपल्या वासनेचा शिकार बनवले. भक्तीच्या या नगरीत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपी आकाश सोनाजी भामरे याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जातोय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगावमधील ही घटना उजेडात आल्यानंतर जिल्हाभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पीडित तरूणीला नराधमाने विश्वासात घेऊन गजानन महाराज मंदिर परिसरातीलच एका लॉजवर नेलं. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कुणाला काही सांगीतले तर मारून टाकेन अशी धमकी दिली.

पीडित तरूणीने तात्काळ शेगाव पोलिसात धाव घेत आपल्यासोबत घडलेला प्रसंग पोलिासंना सांगितला. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत गजानन महाराज मंदिर परिसरातून आकाश सोनाजी भामरे या नराधम आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून 80/2026, 64,74,351(2)BNS यासह कलम 3(1),(W), (1),3(1)(W)(2),3(2)(V), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला. शेगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे मात्र मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे. या घटनेमुळे शेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT