Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: बाळाला श्वास घ्यायला त्रास, भोंदूबाबाने गरम विळ्याचे दिले ६५ चटके; प्रकृती गंभीर

Maharashtra black magic crime: एका २२ दिवसाच्या बाळाला गरम विळा तापवून ६५ वेळा चटके देण्यात आलं आहे. गावातील भोंदूबाबाने हे चटके दिल्याची चर्चा असून, या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

चिखलदराच्या सिमोरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २२ दिवसाच्या बाळाला गरम विळा तापवून ६५ वेळा चटके देण्यात आलं आहे. गावातील भोंदूबाबाने हे चटके दिल्याची चर्चा असून, या संतापजनक घटनेमुळे अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात उपचार सुरू आहे.

बाळाला श्वास घ्यायला त्रास झाला, म्हणून बाळाच्या नातेवाईकांनी भोंदू बाबाकडे नेले. भोंदूबाबांनी त्याला चटके दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळाला चटके दिल्यानंतर त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली. बाळाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यावर बाळाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या मुलाला चटके कुणी दिले ते मला माहित नाही. जेव्हा चटके दिले तेव्हा मी घरी नव्हतो. अशी प्रतिक्रिया लहान बाळाच्या वडिलांनी दिली. त्यामुळे बाळाच्या पोटाला नेमके चटके कुणी दिले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेळघाटात लहान बाळांना कुठलाही आजार झाला तर, ज्येष्ठ सदस्यांकडून पोटावर चटके देण्याची प्रथा आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यावर खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळाला पोटाला गरम चटके दिल्याची चर्चा आहे. बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. बाळाला नागपूरच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर

H1N1 eye symptoms: तुम्हालाही फ्लूनंतर डोळ्यांत जळजळ होतेय? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतो मोठा धोका

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

Google ने Gmail केलं अपडेट, आणलं भन्नाट फीचर; सर्वांनाच होणार फायदा

फडणवीस सरकारचे ५ मास्टरस्ट्रोक! शेतकरी, म्हाडा रहिवासी ते कृषी विभागासाठी मोठे निर्णय, वाचा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT