Bhagyashree Kamble
पुण्यातील कोथरुड भागात गजा मारणे आणि त्याच्या टोळीची मोठी दहशत आहे. गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
मारणे हा मुळशीतील छोट्या गावातील तरुण. मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांपासून गजानन मारणे गुन्हेगारी जगतात आला आणि हळूहळू आपलं जाळं पसरवलं.
जमीन व्यवहारात दलाली आणि खंडण्यामधून गजा मारणे आणि गणेश घायवळने अवैध पैसा कमावला आणि बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला.
खंडणी, मारहाण, हत्या, हत्येचे प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे गजा मारणेवर आहेत.
काही वर्षांपूर्वी गजानन मारणे याला पप्पू गावडे आणि अमोल बुधे हत्या प्रकरणात अटक झाली होती. ७ वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.
३ वर्ष येरवडा जेलमध्ये घालवल्यानंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती.
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोळीने काढलेला रोड शो चर्चेचा विषय ठरला होता. यात तब्बल ६०० गाड्यांचा ताफा होता.
या प्रकरणावरुन पुणे पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवून त्याला पुन्हा अटक केली होती.
आता पुन्हा एकदा गजा मारणे चर्चेत आलाय.