Sambhajinagar Khultabad Women Rape Case News Saam v
महाराष्ट्र

Shocking : नवरा नाईट ड्युटीवर, घरी सासऱ्याकडून सुनेचा लैंगिक छळ ; खुलताबादमधील धक्कादायक घटना

Sambhajinagar Khultabad Women Rape Case News : संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना उघड झाली असून सासऱ्याने सुनेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पती आणि सासूवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पती फरार आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • सासऱ्याने सुनेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप

  • पती आणि सासूवरही गुन्हा दाखल

  • मुख्य आरोपी सासरा अटकेत

  • पती फरार, पोलीस शोध घेत आहेत

  • घटनेमुळे परिसरात खळबळ

सासू सासरे हे आई वडिलांसमान असतात, अशी शिकवण प्रत्येक मुलीला माहेर सोडण्यापूर्वी तिच्या आई वडिलांकडून देण्यात येते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये वडिलांसमान असलेल्या सासऱ्याने सुनेसोबत भयंकर प्रकार केल्याचं समोर आलं आहे. एका महिलेवर तिच्या सासरऱ्याने वारंवार बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीसह तिच्या सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचे १९ डिसेंबर २०१९ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती, सासू-सासरे आणि तीन लहान मुलांसह ती खुलताबाद शहरात राहत होती. तिचा पती हॉटेलमध्ये नोकरी करतो. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार, गेल्या वर्षभरापासून तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. पती हॉटेलवर नाईट ड्युटीला गेलेला असताना सासरा संधी साधून तिच्या खोलीत यायचा आणि लैंगिक अत्याचार करायचा. सदर घडलेला प्रकार पीडितेने तिच्या सासूला आणि नवऱ्याला सांगितला.

मात्र त्या दोघांनी तिचं काहीही न ऐकता "ते तुझी काळजी घेत आहेत, त्यांनी असे केले तर काय झाले?" असं किळसवाणं उत्तर दिलं. वारंवार सुरु असलेल्या अत्याचारांना कंटाळून पीडित महिलेने माहेरची वाट धरली. १४ एप्रिल रोजी सासरा तिला नेण्यासाठी माहेरी आला असता सर्व प्रकार उघड झाला. पीडितेने तिच्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले.

प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. खुलताबाद पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेला पती सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप

Diabetes complications: या 6 अवयवांवर मधुमेहाचा होतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार?

केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

SCROLL FOR NEXT