Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार मोडला, लग्नाच्या ४ वर्षांनी घेतला घटस्फोट

Famous Actor Divorce : टिव्ही इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. जवळपास सहा महिने संवाद नसल्याने दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
Famous Actor Divorce
Famous ActorSAAM TV
Published On: 

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत सध्या झळकणारा अभिनेता मनीष नागदेव याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मनीषने पत्नी मलिका जुनेजा हिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, दोघांचा घटस्फोट या महिन्याच्या सुरुवातीलाच मंजूर झाला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने परस्पर संमतीने नात्याला पूर्णविराम दिला. या कठीण काळाबद्दल मनीषने पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घटस्फोटावर अभिनेता मनीष नागदेव म्हणाला की, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता. जवळपास सहा महिन्यांचा असा काळ होता, जेव्हा आम्ही एकमेकांशी फारसे बोललोच नाही. अगदी साध्या-साध्या गोष्टींवरूनही आमच्यात वाद व्हायचे आणि हळूहळू आमचा संवाद पूर्णपणे थांबला. आम्ही एकाच छताखाली राहत होतो, पण भावनिकदृष्ट्या आम्ही खूप दूर गेलो होतो."

अभिनेता पुढे म्हणाला, "माझ्या मते, दोन व्यक्ती वैयक्तिकरित्या खूप चांगल्या असू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या जीवनसाथी म्हणूनही एकमेकांसाठी योग्य असतीलच. मलिका आणि मी आमचे नाते टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, पण कालांतराने आम्हाला जाणीव झाली की आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही आहोत. खूप विचार केल्यानंतर आणि प्रामाणिकपणे चर्चा केल्यानंतर, आम्ही दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हा काही घाईघाईत घेतलेला किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता. या काळात आम्ही एकमेकांना पुरेशी मोकळीक (space) दिली आणि आमचा संवाद केवळ कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित बाबींपुरताच मर्यादित ठेवला."

Famous Actor Divorce
Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

मनीष पुढे सांगतो, "आम्ही एकमेकांच्या पसंतीने लग्न केले होते आणि आमच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला होता. साहजिकच, त्यांना धक्का बसला आणि सुरुवातीला आमचा वेगळे होण्याचा निर्णय स्वीकारणे त्यांच्यासाठी कठीण होते. परंतु, आम्ही ही परिस्थिती अत्यंत समजूतदारपणे आणि आदराने हाताळल्यामुळे, त्यांनी शेवटी आमचा दृष्टिकोन समजून घेतला आणि आम्हाला पाठिंबा दिला. मला वाटते की, जरी एखादे नाते यशस्वी झाले नाही, तरीही त्यातून कुटुंबांमध्ये कटुता किंवा संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. आम्ही सुरुवातीपासूनच स्पष्ट होतो की, आम्हाला हा टप्पा अत्यंत सन्मानाने आणि सर्वांचा आदर राखून पार पाडायचा आहे."

शेवटी मनीष म्हणाला की, "माझा अजूनही सोबती असण्यावर आणि आयुष्यात कोणासोबत तरी जीवन वाटून घेण्याच्या सौंदर्यावर विश्वास आहे, परंतु लग्नाच्या संस्थेबद्दल मी आता अधिक गांभीर्याने विचार करू लागलो आहे. मला वाटते की, लग्नासाठी केवळ प्रेमापेक्षाही अधिक गोष्टींची गरज असते. त्यासाठी प्रचंड संयम, समज, भावनिक परिपक्वता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुष्याकडे पाहण्याचा समान दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. योग्य व्यक्तीची निवड करणे हे लग्न करण्याच्या निर्णयाइतकेच महत्त्वाचे असते."

मनीष नागदेव करिअर

कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले तर, मनीष नागदेवने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बेगुसराय’ आणि ‘उडान’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विविध मालिकांमधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्याने छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप पाडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.