uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, तुमच्यावर कुणाचा दबाव? उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका

Uddhav Thackeray’s Sharp Attack on Fadnavis: महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (ठाकरे गट) रस्त्यावर. उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांविरोधात हल्लाबोल. राज्यव्यापी आंदोलनात भ्रष्टाचारविरोधी घोषणाबाजी.

Bhagyashree Kamble

  • महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (ठाकरे गट) रस्त्यावर.

  • उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘थीफ मिनिस्टर’ असा उल्लेख करत हल्लाबोल.

  • राज्यव्यापी आंदोलनात भ्रष्टाचारविरोधी घोषणाबाजी.

  • उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाहीत तर, थीफ मिनिस्टर आहेत असं काँग्रेसनं त्यांना म्हटलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'दिल्लीत आज इंडिया आघाडीतर्फे मोर्चा निघाला. हा मोर्चा पोलिसांना अडवला. राज्यातील नेत्यांमध्ये कुणी डान्स बार चालवतंय, कुणी बॅगा घेऊन बसलं आहे. तर काही नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. भाजप देवेंद्र फडणवीस यांची परंपरा पुढे नेतील असं वाटलं होतं, पण गैरवर्तन करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडून देणार असाल तर, मग धनकड कुठे आहेत, त्याचंही उत्तर द्यावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भ्रष्टाचार पे चर्चा करा

'चीनमध्ये सरकारबाबत कुणी काही बोललं तर, त्यांना गायब केलं जातं. उपराष्ट्रपती आहेत तरी कुठे? ते तरी सांगा. त्यांची प्रकृती बिघडली असेल तर सांगा'. असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. 'आज मी उपस्थित सगळ्या शिवसैनिकांना सांगतोय, मोदींनी जशी चाय पे चर्चा केली. तशी तुम्ही जनतेसोबत चर्चा करा, भ्रष्टाचार पे चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत जात नाही. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही', असंही ठाकरे म्हणाले.

भाजप म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष

उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजपकडे अध्यक्ष करायला माणूस नाही, तसंच भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी ठेवायला कुणी नाही का? फडणवीसांना सांगावं की आम्हाला हे लोक काढायचे आहेत. पण त्यांना ना सहन होतंय, ना सांगता येतंय. असा दबाव आहे. माझं म्हणणं आहे, सगळा दबाव झुगारून द्या. फडणवीसांना थोडा जरी स्वाभिमान असेल तर दबाव मानू नका, नाहीतर वरचा दबाव वाढला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Storage: रव्यामध्ये किडे होतात? टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या पद्धती

Mobile Safety : स्मार्टफोन ठेवण्याची चुकीची सवय? सावधान! या दुर्लक्षामुळे होऊ शकते मोठा तोटा

मधुमेहाच्या रूग्णांनी 'ही' फळं खावीत; शुगर वाढण्याची समस्या येणार नाही

Zodiac Stones: राशीनुसार कोणते रत्न परिधान केले पाहिजे, जाणून घ्या

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

SCROLL FOR NEXT