Mumbai Crime news
Mumbai Crime newsSaam Tv News

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

Mumbai Crime news: मुंबईतील काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी मिळून सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी ५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
Published on
Summary
  • मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली संतापजनक घटना

  • अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांकडून सामूहिक अत्याचार

  • पीडितेच्या आईकडून तक्रार दाखल

  • पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा नोंदवून आरोपींना केली अटक

मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी मिळून सामूहिक अत्याचार केला आहे. नराधमांनी आधी मुलीचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले. नंतर तिला ब्लॅकमेल करून अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करणारे पाचही नराधम अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे.

ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नराधमांनी आधी अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ शूट केले. नंतर तिला आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं. नराधमांनी केलेल्या ब्लॅकमेलिंगला तरूणी बळी पडली. तिच्या पाच जणांनी मिळून लैंगिक शोषण केलं.

Mumbai Crime news
१२ वर्षाच्या मुलीवर २०० पुरूषांचा ३ महिने बलात्कार, देहविक्रीच्या दलदलीत चिमुकली कशी अडकली? मुंबई हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही मुले अल्पवयीन असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून तरूणीवर अत्याचार सुरू होता. सततच्या अत्याचाराला कंटाळून तरूणीनं तिच्या पालकांना आपबिती सांगण्याचा निर्णय घेतला. पीडितेनं कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. पीडित मुलीच्या आईनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधमांविरोधात तक्रार दाखल केली.

Mumbai Crime news
सासरच्या छळाला कंटाळली, विवाहितेनं घरातच आयुष्य संपवलं; माहेरच्या मंडळींना वेगळाच संशय

पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा नोंदवून तपास करीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ही पाच मुले नेमकी कोण आहेत? यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर काळाचौकी परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com