Shilpa Bodkhe Resign Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! खरमरीत पत्र लिहित बड्या महिला नेत्याने ठोकला पक्षाला रामराम

Shilpa Bodkhe Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्ष प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्ष प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.

गंभीर आरोप करत राजीनामा..

"माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र! माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी (Aditya Thackeray) यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे,"

"मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा," असा घणाघाती आरोप शिल्पा बोडके यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर..

दरम्यान, ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. या दौऱ्यात चिखली येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली. त्यानंतर मोताळा येथेही त्यांची जाहीर सभा होणार आहे. एकीकडे ठाकरेंनी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच बड्या महिला नेत्याने साथ सोडल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

SCROLL FOR NEXT