Mahanand Dairy : 'महानंद'वरुन संजय राऊतांनी केलेले आरोप जिव्हारी, राधाकृष्ण विखे पाटील थेट चॅलेन्च देत म्हणाले...

Radhakrishna Vikhe Patil : महानंद डेअरीच्या संचालकांच्या राजीनाम्यांवर संजय राऊत यांनी विखे-पाटील यांच्यावर जोरदार घाणाघाती टीका केली. विखेंच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी प्लॅनिंग करून महानंद डेअरीची ५० एकर जमीन अदानीला विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांच्यावर केला होता.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil saam Tv
Published On

Radhakrishna vikhe Patil Vs Sanjay Raut Over Mahanand Dairy:

महानंद डेअरीवरून खासदार संजय राऊत आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील याच्यात वाद शिगेला पोहोचलाय.महानंद डेअरीची जागा अदानी यांना विकण्याचा डाव आखल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या आरोपाला उत्तर देत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राऊतांना सुपारी बाज म्हटलंय. संजय राऊत यांचे आरोप खरे असले तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं आव्हान विखे-पाटील यांनी दिलंय. (Latest News)

राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या चेअरमनसह १७ संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारची ही संस्था गुजरातकडे जाणार असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्यावर शेलक्या शब्दात हल्ला चढावला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, महानंदाच्या संचालकांवर दबाव टाकून राजीनामे घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महानंदाच्या संचालकांना सहकार कायद्याच्या कलम 78 नुसार कारवाईची भीती दाखवून राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. स्वच्छेने राजीनामे द्या, अन्यथा सहकार कायद्याच्या कलम 78 नुसार कायदेशीर कारवाईला सामोरे जा. असे दोन पर्याय संचालकांसमोर ठेवण्यात आले होते.

संचालकांच्या राजीनाम्यांवर संजय राऊत यांनी विखे-पाटील यांच्यावर जोरदार घाणाघाती टीका केली. विखेंच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी प्लॅनिंग करून महानंद डेअरीची ५० एकर जमीन अदानीला विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांच्यावर केला होता. यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे.

अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणतात ती दाखवावी. त्यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार असल्याचं विखे पाटील म्हणालेत. आजपर्यंत काही गोष्टींचे पथ्य आम्ही पाळतोय मात्र सवंग लोकप्रियतेसाठी असे आरोप करणार असतील आणि बदनामी करणार असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगायची तयारी ठेवावी. संजय राऊत यांनी त्यांच्या जीवनात काय व्यक्तिगत उद्योग केले कोणाचे घर उद्ध्वस्त केले त्याचे नाव मला सांगावे लागतील. तुम्ही माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत. ते आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेऊन टाकील असे चॅलेंज राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

त्याचवेळी विखे-पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यासारखे सुपारी बाज लोक पिसाळलेला कुत्र्यासारखे अंगावर धावू लागले आहेत. राऊत यांच्या विधानावर मी भाष्य करणे आवश्यक नाही त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका असं देखील विखे यांनी म्हणालेत.

Radhakrishna Vikhe Patil
Mahanand Dairy : महानंद डेअरीच्या कर्मचाऱ्यांचा ७ महिन्याचा पगार रखडला; डेअरीच्या प्रवेशद्वारावर कर्मचा-यांची निदर्शने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com