Solapur Breaking News: '१५ टक्के कमिशन दे नाहीतर...' ठेकेदाराला धमकी;  शिंदे गटाच्या  जिल्हाप्रमुखावर खंडणीचा गुन्हा
Maharashtra Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Solapur Breaking News: '१५ टक्के कमिशन दे नाहीतर...' ठेकेदाराला धमकी; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर खंडणीचा गुन्हा

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. ३ जुलै २०२४

महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष काळजे असे गुन्हा दाखल झालेल्या जिल्हाप्रमुखाचे नाव आहे. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरुन अधिवेशनामध्ये सत्ताधारी- विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळत असतानाच आता शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी सोलापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका ठेकेदार आकाश कानडे याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनातच ही मारहाण झाल्याचे फिर्यादित नमूद आहे.

एमआयडीसी परिसरात ड्रेनेज लाईनची निविदा निघाली असून ती माघारी घे अन्यथा मला 15 टक्केप्रमाणे प्रोटोकॉल दे अशी मागणी मनीष काळजे याने केली. ठेकेदार आकाश कानडे याने याला विरोध केल्यानंतर मनपा अधिकाऱ्याच्या दालनातच त्याला मारल्याची तक्रारीत म्हटले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

CNG -PNG Price: सीएनजी-पीएनजीच्या दरात होणार वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; जाणून घ्या नवे दर

Marathi Live News Updates: मालेगाव-मनमाड रोडवरील नांदगाव फाटाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात

VIDEO: Worli Hit and Run प्रकरणी कोर्टाचा पोलीसांना झटका, राजेश शहा यांना जामीन मंजुर

SCROLL FOR NEXT