Pune News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तिघांना २९ लाखांचा गंडा; तोतया लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा

3 People Cheated 29 Lakhs For Getting Job In Army: कोल्हापूरातील एकाच कुटुंबातील तिघांना लष्करात नोकरी मिळवून देतो असे सांगत फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तिघांना २९ लाखांचा गंडा; तोतया लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा
3 People Cheated 29 Lakhs For Getting Job In ArmySaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

भारतीय लष्करात (Indian Army) नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत एकाच कुटुंबतील तिघांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांना २९ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात (Khadaki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तिघांना २९ लाखांचा गंडा; तोतया लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा
Pune Porshe Accident: पोर्शे अपघातातून सुटला, फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला! विशाल अगरवालला पुन्हा अटक; प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील एकाच कुटुंबातील तिघांना लष्करात नोकरी मिळवून देतो असे सांगत फसवणूक करण्यात आली आहे. तिघांनाही तब्बल २९ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याचे त्यांना आमिष दाखवण्यात आले होते. संदीप गुरव या तरुणाने तिघांची फसवणूक केली आहे. या तरुणाविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तिघांना २९ लाखांचा गंडा; तोतया लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा
Pune L3 Hotel Drugs Party: पुणे L3 बार पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. संदीप गुरवची साथीदार अश्विनी पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी साताप्पा वाघरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

Pune News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तिघांना २९ लाखांचा गंडा; तोतया लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा
Pune Landslide News: पुण्यातील सिंहगड घाटात मोठी दुर्घटना,6 टनाचा दगड कोसळला!

साताप्पा वाघरे हे एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून काम करतात. २०२० मध्ये एका मित्रामार्फत त्यांची संदीप गुरवशी ओळख झाली होती. गुरव हे आर्मीमधून सेवानिवृत्त झाले असून त्यांची दलात मोठी ओळख असून वेगवेगळ्या पदावर नोकरी लावण्याचे ते काम करतात असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांचा भाचा हा आर्मी भरतीची तयारी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी संदीपकडे भाच्याला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली

त्यानंतर संदीपने साताप्पा वाघरे यांना त्यांच्या भाच्याला घेऊन खडकीतील मिलिटरी हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. कुटुंबातील ३ जणांनी तिथे भेट दिली. या आर्मी ऑफिसरने तिघांचे नोकरीचे काम होईल अशी बतावणी केली. पण प्रत्येकी १२ लाख रुपये प्रमाणे ३६ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांना काही बनावट कागदपत्र सुद्धा दिले. आरोपी संदीपने इतर काही जणांची फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तिघांना २९ लाखांचा गंडा; तोतया लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा
Pune Metro Escalator Accident : धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com