Pune Metro Escalator Accident : धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू

Man Died in Pune metro station : पुण्यात मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ४० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू
Man Died in Pune metro station : Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील मेट्रो स्थानकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर ही घटना घटना घडली आहे. मेट्रो स्थानकात ४० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज कुमार असे प्रवाशाचे नाव आहे. मेट्रो स्थानकात मनोज कुमार या नावाचा प्रवासी सरकत्या जिन्यावरून अचानक पडला. या दुर्घटनेत या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. प्रवाशाच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. मेट्रो स्थानकात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. पुणे पोलिसांकडून मेट्रो स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे.

धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू
Zika Virus in Pune : चिंता वाढली! पुण्यात झिका रुग्णाची संख्या पोहोचली ६ वर; २ गरोदर महिलांनाही लागण

नेमकं काय घडलं?

पुण्यातील जिल्हा न्यायालयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता सरकत्या जिन्यावरून जाताना मृत्यू झाला. स्थानकातील मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावर जाताना अचानक प्रवासी मनोज कुमार पडले. मनोज कुमार यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शवनिच्छेदनातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. मात्र, त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनोज कुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर मनोज कुमार राहत असलेल्या परिसरातही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सरकत्या जिन्यावरून उतरणाऱ्या मुलीचा व्हायरल झाला होता. या मुलीचा सरकत्या जिन्यावरून उतरताना अपघात झाला होता. या सरकत्या जिन्यात या मुलीचा पाय अडकला होता. त्यानंतर मॉलमधील कर्मचाऱ्यांनी या सरकते जिने तातडीने थांबवले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.

धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू
Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाहा VIDEO

शिक्रापूरमध्ये कारने घेतला अचानक पेट

पुण्यातील शिक्रापूरमध्ये एका कारने अचानक पेट घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखत शिक्रापूर पोलीस आणि स्थानकि नागरिकांच्या मदतीने तात्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही कार सीएनजी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील खेडमध्ये बसचा अपघात

पुण्याच्या खेड तालुक्यात मोफत पंढरपूर यात्रा करून परतलेल्या बसला अपघात झाला. या अपघात २१ ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले. खेड तालुक्यात विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराने पंढरपूरला घेऊन गेलेल्या बसला अपघात झाला. अपघातातील २१ जणांवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. खेड तालुक्याच्या आढे गावाजवळ पहाटे हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com