Helicopter Crash Video : आकाशात लष्कराच्या २ हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक; भीषण अपघातात १० लोकांचा मृत्यू, Video

Helicopter Crash Video News :मलेशियाच्या नौदलाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान लष्काराचे दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Helicopter Crash Video
Helicopter Crash Video Saam tv

नवी दिल्ली : मलेशियातून अपघाताचं मोठं वृत्त समोर आलं आहे. मलेशियात नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक झाली. या दुर्घटनेत दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. मलेशियाच्या नौदलाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान लष्काराचे दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याने देशात खळबळ उडाली आहे.

नौदलाच्या सराव मंगळवारी लुमुटच्या रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियम सुरु होता. मलेशियातील दुर्देवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक होताना दिसत आहे. हे दोन्ही हेलिकॉप्टर फेनेक एम502-6 आणि एचओएम एम503-3 चे होते.

Helicopter Crash Video
Earthquake VIDEO: तैवानमध्ये एका रात्रीत ८० भूकंपाचे धक्के; इमारती हादरल्या, VIDEO समोर

पहिलं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन स्टेडियमच्या पायऱ्यावर कोसळलं. तर दुसरं हेलिकॉप्टर हे स्विमिंग पुलात कोसळलं. मलेशियाच्या नौदलाचं याबाबत माहिती देताना म्हटलं की, 'नौदलाच्या ९० व्या स्थापनादिनानिमित्त तीन ते पाच मेच्या कार्यक्रमासाठी सैन्य परेडसाठी सराव सुरु होता. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Helicopter Crash Video
Andhra Pradesh News: लग्न मंडपात तुफान राडा, प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला कुटुंबियांनी फरफटत नेलं; VIDEO व्हायरल

या अपघातातील काही सर्व लोक क्रू मेंबर होते. अपघातानंतर मृतदेह हे रुग्णालयात पाठविण्यात आली आहे. मलेशियाच्या स्थानिकवेळेनुसार, मंगळवारी सकाळी ९.३२ वाजता झाली.

या घटनेनंतर आयोगाने अपघाताची चौकशीसाठी समिती नेमली आहे. अशा घटना सातत्याने घडल्याने देशात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील महिन्यात अशीच घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. मागच्या वर्षी देखील अशीच घटना घडली. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com