कैसर खालिद मुंबई लोहमार्ग पोलिसांचे (GRP)चे तत्कालीन आयुक्त आहेत. त्यांच्याच कार्यकाळात दुर्घटनाग्रस्त होर्डिगला परवानगी देण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलिससह आयुक्तपदावर असलेल्या प्रवीण पवार यांची बदली करण्यात आली आहे. २० दिवसांपूर्वी संदीप पाटील यांच्याकडे होता आयुक्तपदाचा प्रभार.
स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना घडलीय. चालकाचं नियंत्रण सुटल्याने स्कूल बस थेट मेडिकलमध्ये घुसली. दरम्यान मेडिकल शॉपमध्ये ग्राहक नसल्याने कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.
पुणे L3 बार प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. L3 मध्ये मुंबईतून ड्रग्स आणले गेलेत. नितीन ठोंबरेने हे ड्रग्ज आणले होते. नितीन ठोंबरेकडे पाच ग्रॅम अमली पदार्थ सापडलेत.
लक्ष्मण हाके उद्या पासून तीन दिवसाच्या अभिवादन दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. यानंतर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी, आणि त्या नंतर 27 तारखेला, गोपीनाथगड,भगवानगडआणि 28 तारखेला चौंडी येथे जाणार आहेत.
मलकापूर नगरपालिकेच्या माजी बांधकाम सभापतीसह चार नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहेत. उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश करणार आहेत.
हाराष्ट्रातील भाजप खासदारांची उद्या सकाळी महाराष्ट्र सदनात बैठक होणार आहे. नितीन गडकरी यांनी ही बैठक बोलवली आहे. लोकसभा अध्यक्ष निवडीपूर्वी ही बैठक होणार आहे. लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी रणनीती ठरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
ड्रग्सचे सेवन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रविवारी झालेल्या पार्टी मध्ये ड्रग्सचे सेवन केल्याचा आरोप ठेवत या दोन जणांना आज पोलिसांनी अटक केलीय. दुपारी या दोघांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
उद्या लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हीप जारी केलाय. लोकसभेत सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यात. INDIA आघाडी कडून के सुरेश यांनी दाखल केला आहे.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या पालकांना आशवस्त केले.
संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय झाला असला तरी जोरदार पाऊस होण्यासाठी जुलै महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सूनचा जोर अजूनही पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही.
लोकसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत भाजपची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रातील मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.
रायबरेलीचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ घ्यायला जात असताना विरोधी पक्षातील खासदारांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी शपथ घेण्यापूर्वी संविधान दाखवलं आणि शपथ घेताना संविधान हातात घेतलं होतं. के. सी. वेणुगोपाल, अखिलेश यादव यांनी उभे राहून बाकं वाजवली.
आज एकूण 26 ठिकाणी कारवाई करण्यात आलीय. एकूण 34,000 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई झालीय. ज्या हॉटेलमध्ये ड्रग्स सापडले येथे एक्ससाइस विभागाचे सील ते सिल काढायला सांगून कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. गेल्यावेळी अपघात झाला त्यावेळी 144 ठिकाणी/3.50 लाख चौरस फूट क्षेत्रावर कारवाई झालीय. घटना घडली म्हणून कारवाई करू नका तर तर अवैध बांधकामावर वेळोवेळी कारवाई करीत राहा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या 18 नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. या निर्णयामुळे राज्यातील अनेक पुनर्वसित गावठाणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. आज दिल्ली उच्च न्यायालयात आज केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिलाय.
राज्यभर फिरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी बारामती येथील राज्य कार्यकारणी समोर ठेवला राजीनामा. राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. वडिलांचे वय 72 झाले आहे. आई आजारी आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे.शेतीकडे दुर्लक्ष होत असल्याचं कारण देत त्यांनी राजीनामा दिला.
अजित पवार गट कळवा मुंब्रा येथील विधानसभेची जागा लढवणार आहेत. विद्यमान आमदार शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना देणार आव्हान देणार. ही जागा अजित पवार गट लढणार तसेच घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माहिती दिलीय.
पुण्यातील L3 बारमध्ये कथित ड्रग्सचे सेवन करणाऱ्या २ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका तरुणाला पुणे पोलिसांनी पुण्यातून तर दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतले आहे. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांना एक निवेदन मिळाले आहे. धनराज गुट्टे यांनी हे निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. या निवेदनात जरांगे हे चुकीच्या मागण्या करीत आहेत आणि जातीय ते निर्माण करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे. जर गुन्हा दाखल केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही दिलेला आहे. त्यावरून संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने एक पत्र मुंबई सचिव कारल्याला पाठवले आहे. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला तसे पत्र पाठवले आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला आज लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं., दरम्यान न्यायालयाने आरोपी संजय जाधव याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याचे घटना कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखम झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचं देखील नुकसान झालं आहे . शैलेश ढोणे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास करत कार चालक मुकेश तरे याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असून राज्य भाजपमध्ये दुर्लक्षित असलेल्या नेत्यांना आता दिल्लीतून संपर्क सुरू आहे.राज्यातील भाजपची स्थिती सुधारण्यासाठी काय करावे लागेल? याची माहिती घेतली आहे. तसेच केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या मतदारसंघांमध्ये मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा,अनुशक्ती नगर- कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर- मानखुर्द यापैकी जागा मागण्याची शक्यता असून राखी जाधव थोड्याच वेळा शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत.
राज्यातील जवळपास ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पाऊस आणि शेतीविषयक कामात शेतकरी, सभासद व्यस्त असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आले असून सहकार खात्याने यासंबंधी परिपत्रक काढले आहे. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात आज हंटर मोर्चा काढण्यात येणार आहे. बँकेतील घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करावी, तसेच प्रशासक नेमून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवर हा मोर्चा काढण्यात येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा हंटर मोर्चा काढण्यात येणार असून शहरातील स्टेशन चौक येथून जिल्हा बँके पर्यंत हा मोर्चा निघणार आहे.
नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत 6 वी मध्ये शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शाळेला आल्यानंतर वर्गातील बेंचवर बसताच आली मुलीला चक्कर आल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. दिव्या त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीमधील संसद भवनात आज खासदारकीची थेट इंग्रजीमधून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत इंग्रजीचा वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता दिल्लीत थेट इंग्रजीमध्ये शपथ घेऊन विखेंना उत्तर दिले. लंके यांच्यासोबत प्रतिभा धानोरकर, धैर्यशिल मोहिते पाटील, प्रणिती शिंदे यांनीही खासदारकीची शपथ घेतली.
नागपूर
नागपूर विमानतळावर स्फोट घडवून आणू अशा आशयाच्या धमकीचा मेल नागपूर विमानतळ प्रशासनाला मिळाला आहे. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांकडून विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी मराठीतून शपथ घेतली.
नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नांदेड जिल्ह्यात आता पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळे तिथे आम्हाला मोठी मदत होईल, असे जयंत पाटील म्हणाले.
दूध दर वाढीसाठी नगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांच्या जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून शेतकऱ्यांनी नेवासा - संगमनेर राज्यमार्ग अडवत राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या.
महाराष्ट्रातील अकरा विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. या ११ पैंकी ३ जागा काँग्रेस लढवण्याबाबत नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. माणिकराव ठाकरे, नसीम खान, संध्या सव्वालाखे, काकासाहेब कुलकर्णी अशी संभाव्य उमेदवारांची नावे आहेत.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात पोलिसांनीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर फाडल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरच्या माणगावमध्ये हा प्रकार झाला असून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने माणगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला निवेदन देण्याचे आंदोलन केले होते. मात्र आंदोलनासाठी आणलेलं पोस्टर पोलिसांनी आंदोलना आधीच फाडले.
नीट परीक्षा घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केलेला संजय तुकाराम जाधव हा शिक्षक माढा तालुक्यातील टाकळी गावच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळा सुरु झाल्यापासून तो शाळेकडे फिरकलेला देखील नव्हता. उपशिक्षकाचे नाव नीट परिक्षा कनेक्शनमध्ये आल्याने सोलापूर जिल्हाच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष INDIA आघाडीला लोकसभेचे उपाध्यक्षपद देण्याची NDA ची तयारी असल्याने ओम बिर्ला लोकसभेचे बिनविरोध अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. आता INDIA आघाडीकडून उपाध्यक्ष पदासाठी कोणाचं नाव निश्चित होत हे पाहणं महत्वाचं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात महालगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांना समर्थन देण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे. आज दिवसभर ही बंदची हाक देण्यात आलेली असून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मार्केट बंद राहणार आहे.
पुणे शहरातील एल-थ्री बारमध्ये समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेकडून या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेची परवानगी न घेता हॉटेलमध्ये बदल केल्याने पालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून महानगरपालिकेच्या वतीने आज अनेक ठिकाणी होणार कारवाई होणार आहे.
पुण्यातील L 3 बारमध्ये फॉरेन्सिक पथकाकडून ड्रग्स पडताळण साठी तपासणी करण्यात आली आहे . तसेच बारमधून काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बारमध्ये पार्टी करणाऱ्या दोघांचं ब्लड सॅम्पल पुणे पोलिसांनी घेतलं असून पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पार्टीमध्ये यांनी ड्रग्स सेवन केलं होतं का? याच्या तपासासाठी पुणे पोलीस या दोघांच्या रक्ताची चाचणी करणार आहे.
लोकसभा अध्यक्ष पदाची माळ पुन्हा एकदा ओम बिर्ला यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे. आज ओम बिर्ला हे अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील नवश्या गणपती मंदिरात दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अंगारिका चतुर्थी निमित्त मंदिरात तब्बल दोन हजार किलो फुलांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे. तब्बल दोन किलोमीटर रांगा लावून भाविक दर्शन गणपतीचं दर्शन घेत आहेत. आज दिवसभरात एक लाखाहून अधिक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतील, अस मंदिर विश्वस्तांचं म्हणणं आहे.
राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू आहे. केरळमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी २१ आणि २२ जून दोन दिवसीय शिबीर संपन्न झाली असून केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५-१० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. केरळ विधानसभेत किमान ५ जागांवर विजय मिळवण्याचा मानस पक्षाकडून करण्यात आला आहे. केरळ मधील २०२५ च्या येणाऱ्या पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील परिस्थिती अंदाज घेऊन पुढील रणनिती ठरणार असून केरळनंतर आता पुढील शिबीर हे काश्मिरमध्ये होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता सुनेत्रा पवार यांना राज्यसभा अध्यक्षांकडून शपथ घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतील. यानिमित्ताने दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जल्लोषाचं वातावरण आहे. अजित पवार गटाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे सुद्धा आज शपथ घेणार
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी लागली किंवा पुढे ढकलण्यात आली. तर कुठे नियोजित कार्यक्रमाही बदलावा लागला आहे , मात्र बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीचे नियोजित वेळेनुसारच पोलीस भरती सुरू आहे . आणि याचं कारणही तसंच आहे.
बुलढाण्यातही गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे .मात्र पोलीस अधीक्षकांच्या योग्य नियोजनामुळे पोलीस भरतीत कुठलाही खंड पडलेला नाही . पोलीस अधीक्षकांनी सुरुवातीपासूनच या भरतीचे योग्य नियोजन केलं होतं आणि त्यामुळे पाऊस आला तरी रात्री पोलीस भरतीचे संपूर्ण ग्राउंड हे ताडपत्रीने झाकल्या जात आहे.
त्यामुळे पाऊस आला तरी ग्राउंड ओल होत नाही किंवा चिखल होत नाही आणि त्याचमुळे पोलीस भरती प्रक्रिया बुलढाण्यात नियोजित वेळेनुसार सुरू आहे. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये ही यामुळे उत्साह आहे. येत्या 2 जुलै पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे .
नीट पेपरफुटीतील 4 आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
तर इतर दोघांना संशयित म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात
अटकेत असलेल्या आरोपींचे सब एजंट असल्याची माहिती
आणखीन नवीन चेहरे समोर येथील अशी सूत्रांची माहिती
आरोपींच्या मोबाईलमध्ये 12विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड सापडल्याने खळबळ
आज काही विद्यार्थी आणि पालक यांना पोलीस ठाण्यात बोलून पोलीस चौकशी करणार असल्याची देखिल सूत्रांची माहिती....
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुरुंगातील एका कैद्याने थेट तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तुरुंगाअधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कैद्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर असं हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. कळंबा कारागृहातील गांजा प्रकरण, हत्यार प्रकरण, मोबाईल प्रकरणानंतर आता थेट कैद्याकडून अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासन गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त गर्भगृह सजवण्यात आला आहे, सकाळपासून प्रसन्न वातावरणात अभिषेख महापूजा करण्यात आलीय. यावेळी महापूजेत दाम्पत्य बसवून पूजा करण्यात आली.
पुणे ड्रग्ज प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. अनंत पाटील असं निलंबित अदिकाऱ्यांचं नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ही कारवाई केली.
अनंत पाटील यांच्यावर एफसी रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीमध्ये मद्यविक्री प्रकरणात कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात काल निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावरही निलंबनाची केली होती कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या सायकल ट्रॅक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेय. नवी मुंबईकरांना आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक प्रवास करता यावा यासाठी पाम बीच मार्गालगत 5 किलोमीटरचा सायकल ट्रॅक उभारण्यात आलाय. नागरिकांनी जवळच्या प्रवासासाठी वाहनांचा वापर न करता सायकलीचा वापर करून प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी हातभार लावावा या उद्येश्याने या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आज मुंबई मधील विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे आणि गेल्या २०१९ च्या विधानसभेत पक्षाने मुंबईत ६ जागा लढवल्या होत्या.
आत्ता लोकसभेतील यशानंतर मुंबईत यंदा विधानसभेच्या निवडणुकीत ६ पेक्षा अधिक जागा लढवण्याचा निर्धार घेतला आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून मलबार हिल,भायखळा,विक्रोळी,सायन-कोळीवाडा,अणुशक्ती नगर,कुर्ला,दिंडोशी,वर्सोवा,अंधेरी पश्चिम,दहिसर,घाटकोपर पूर्व,घाटकोपर पश्चिम आणि शिवाजी नगर-मानखुर्द या विधानसभा मतदार संघाचा रिपोर्ट मुंबई अध्यक्षा राखी जाधव या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर मांडणार आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा करण्यात आलेल्या या काही विधानसभेमध्ये सध्या महाविकास आघाडी मधील विद्यमान आमदार आहेत.
नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली असून डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येणाऱ्या परिसरात २०० रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. महिनाभरात तब्बल ९४ जणांना झालीय डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. औषध फवारणी करण्याची नागरिकांची मागणी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.