Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO

Sanjay Raut Press Conference Delhi: राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे मोदींनीही बालक बुद्धी म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती.
Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO
Sanjay Raut News Saam tv

दिल्ली, ता. ३ जून २०२४

लोकसभा संसदेत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे मोदींनीही बालक बुद्धी म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावलं आहे. ४०० पार वरुन ते जेमतेम २०० पार झालेत त्याला जबाबदार राहुल गांधी आहेत. राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत हे त्यांना सहन होत नसेल. विरोधी पक्षनेत्याला घटनात्मक दर्जा आहे, मोदी बालक बुद्धी म्हणत असतील तर तो त्या पदाचा अपमान आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

"संविधान खतरे हैं हे आम्ही का म्हणतो ते आता समजल असेल. माझाही काल बोलताना माईक बंद करण्यात आला. मी लोकसभेतील काही जागा चोरल्या हे बोलताना माईक बंद केला. आणीबाणीच सत्य मला सांगायचं होत पण त्यांनी माझा माईक बंद केला, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO
Nanded Crime : भाजप पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. "भाजपला एका मताची गरज आहे, नवाब मलिकांना आता विरोध केला का? असा सवालही राऊत यांनी केला. आम्ही विधानपरिषदेचे तिनही उमेदवार निवडणून आणू. आम्ही तसे नियोजन केले आहे, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO
Pune Porshe Accident: पोर्शे अपघातातून सुटला, फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला! विशाल अगरवालला पुन्हा अटक; प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com