Special Report : नार्वेकरांना संधी की युतीची नांदी?; लिफ्टमध्ये लिहिलं विधानपरिषदेचं स्क्रीप्ट?

Maharashtra Politics 2024 : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरेंसोबत होते मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीसांसोबत होते प्रवीण दरेकर. आता यातल्या नार्वेकरांनी ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचा अर्ज दाखल केलाय.
Special Report
Special ReportSaam Digital

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय. नार्वेकरांच्या उमेदवारीचं स्क्रीप्ट ठाकरे-फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीतच लिहिलं गेल्याचं बोललं जातंय. तर याचा दुसरा अंक नार्वेकर आणि दरेकरांनी विधानभवनातल्या एका कोप-यात गुफ्तगू करत लिहिल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही युतीची तर नांदी नाही ना असा प्रश्न पडलाय. विधानपरिषदेच्या आडून नेमकं काय शिजतय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्यामुळेच कुठे-कशी-आणि कुणासोबत निवडणुकीच्या राजकारणाची काय खिचडी शिजेल ते सांगता येत नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आणि त्यांची सर्वातआधी भेट झाली ती त्यांचे कट्टर राजकीय शत्रू देवेंद्र फडणवीसांसोबत. दोघेही लिफ्टच्या बाहेर भेटले आणि सोबतच लिफ्टमधून सभागृहात गेले. मात्र या लिफ्टमध्येच विधानपरिषद निवडणुकीची स्क्रीप्ट लिहिली गेल्याची चर्चा आता विधानभवन परिसरात सुरू झालीय. कारण या भेटीचा दुसरा अंकही विधानभवनात रंगलाय.

आता तुम्ही म्हणाल हा दुसरा अंक कसा? लिफ्टमध्ये उद्धव ठाकरेंसोबत होते मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीसांसोबत होते प्रवीण दरेकर. आता यातल्या नार्वेकरांनी ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचा अर्ज दाखल केलाय. महायुतीनं आपले ९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर मविआनंही तीन उमेदवार उतरवले आहेत. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे विनविरोध निवडणुकीची शक्यता मावळलीय. त्यामुळे प्रत्येकालाच आता मतांची जुळवाजळव करावी लागणार आहे. आणि हीच जुळवाजुळव नार्वेकरांसाठी लिफ्टच्या मिटिंगमध्ये झाली का? अशा चर्चांनाच आता उधाण आलंय. त्यामुळेच संख्याबळ नसतानाही नार्वेकर जिंकून येण्याचा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना आहे.

Special Report
Maharashtra Monsoon Session : चर्चा अर्थसंकल्पावरची...वाद रंगला रवी राणांच्या वक्तव्याचा; सत्ताधारी-विरोधक सभागृहात भिडले

तुम्हाला हे साट्यालोट्याचं गणित समजून घ्यायचं तर थोडं मागं जावं लागेल. तुम्हाला आठवत असेल मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणुकीत फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय दिवंगत अमोल काळेंना अध्यक्ष बनवण्यासाठी ठाकरे आणि फडणवीस एकत्र आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. कारण काळेंच्याच पॅनलमध्ये नार्वेकरही निवडून आले होते. या सा-या क्रिकेटमधल्या राजकीय जुळवाजुळवीच्या खेळात आशिष शेलारांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता विधानपरिषदेत जाण्यासाठी नार्वेकर सज्ज झाले आहेत. आणि त्यासाठीच ठाकरे-फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र तर आले होते का? अशी चर्चा रंगलीय. दरेकरांना लिफ्टमधून बाहेर काढा म्हणणारे उद्धव...आणि तुम्ही एकत्र येत असाल तर बाहेर जायला तयार आहे असे म्हणणारे दरेकर आता नार्वेकरांशी गुफ्तगु करतायत. हे केवळ विधानपरिषदेपुरती जुळवाजुळव आहे की पुन्हा भाजप-ठाकरेंच्या युतीची नांदी याचा निकाल विधानसभा निवडणुकीतच लागेल.

Special Report
Vidhan Parishad: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १४ सदस्य रिंगणात, नार्वेकरांना मैदानात उतरवून ठाकरेंनी काय केली खेळी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com