Maharashtra Monsoon Session : चर्चा अर्थसंकल्पावरची...वाद रंगला रवी राणांच्या वक्तव्याचा; सत्ताधारी-विरोधक सभागृहात भिडले

Assembly Session : आमदार रवी राणा यांनी काँग्रेवर टीका करताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा निवडणुकीत पाडण्याचं काम केलं, असं विधान विधानसभेत केलं, त्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ पहायला मिळाला.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionSaam Digital

सूरज मसुरकर

विधानसभा सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आणि त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली. या चर्चेत अनेक आमदारांनी आपली मतं व्यक्त केली तर, काहींनी टीका देखील केली. अर्थसंकल्पावर बोलताना जेव्हा आमदार रवी राणा बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी बोलता बोलता काँग्रेवर टीका करताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा निवडणुकीत पाडण्याचं काम हे काँग्रेसने केलं तसेच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला विरोध याच काँग्रेसने केला अशी टीका केली आणि सभागृहात एकच गदारोळ झाला.

या वादात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच आमदार योगेश सागर आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उड्या घेतल्या. या टेकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काँग्रेसने कधीही डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नला विरोध केला नाही, असं म्हणत, रवी राणा जे बोलले ते रेकॉर्डवरुन काढून टाका अशी मागणी, जितेंद्र आव्हाड यांनी तालिका अध्यक्षांना केली मात्र रवी राणा जी काही बोलले ते तपासून त्यानंतर ते रेकॉर्डवरुन काढून टाकू असं सांगण्यात आल्यानंतर, जितेंद्र आव्हाड हे आणखीनच आक्रमक झाले.

आणि त्यानंतर सभागृहात एन्ट्री झाली ती विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांची आणि त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला. आणि त्यांनी सुद्धा काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतरत्न ला कधीही विरोध केला नाही रवी राणांनी जे वक्तव्य केले ते रेकॉर्ड वरून काढून टाकावे, अशी मागणी विजय वड्डेटीवार यांनी केली. आणि पुन्हा एकदा विजय आणि जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले. या सगळ्या नंतर आमदार रवी राणा यांनी स्पष्टीकरण देत मी काय चुकीचं बोललो ते सांगा, भारतरत्न जेव्हा दिला, तेव्हा तो काँग्रेसने नाही दिला, हे मी बोललो. काँग्रेसने विरोध केला हे मी बोललो नाही. असं सांगत केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा मागे फिरून सारवा सराव करण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Monsoon Session
Maharashtra Legislative council : महाविकास आघाडी विधान परिषदेतही महायुतीला झटका देण्याच्या तयारीत; तिसऱ्या उमेदवाराचीही केली घोषणा?

मात्र यानंतर वड्डेटीवार यांनी सभागृहात काही सवाल विचारले ते म्हणजे, घटनेला मान्यता कोणी दिली, तर ती काँग्रेसने दिली, समितीचा अध्यक्ष बाबासाहेबांना कोणी बनवले तर गांधीजीनी बनवले. असं सांगत काँग्रेसची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसची बाजू मांडत असताना त्यांनी जर का संविधानाला कोणी विरोध केला असेल तर तो जनसंघ पक्षांनी केला असं बोलून गेले आणि पुन्हा एकदा यावरून सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली. तेव्हा जर कोणी विरोध केला, तर तो हिंदू महासंघाने केला, अस वड्डेटीवार म्हणाले. या वक्तव्यावर आमदार योगेश सागर यांनी हरकत घेऊन बाबासाहेबांना हरवण्याचा काम काँग्रेसने केलं अशी पुन्हा एकदा टीका केली.

पण शांत बसणार ते आव्हाड कसले? मग आव्हाडांनी देखील, इतिहासचं सभागृहात वाचून दाखवला. २६ नोव्हेंबर १९४९ ला सविधान सादर करण्यात आले, आणि ते आपण स्वीकारले. तेव्हा आपण सविधान मानत नाही, त्यात मनुस्मृती नाही, आम्ही ती मानत नाही अस RSS ने म्हटलं होतं. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी वादाला आणखीनच वाट मोकळी करून दिली. आरएसएस वर केलेल्या या ठिकाणी नंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील तितकाच पलटवार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला. आव्हाडांना खोटे बोलण्यात पीएचडी दिली पाहिजे असा टोला त्यांनी लगावला. व दोन्ही नेते यावरती एकमेकांना आव्हान करू लागले की या मुद्द्यावरती आपण रात्रभर चर्चा करूया. मात्र चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेसने किती वेळा घटना दुरुस्ती केली ? तसेच आणीबाणी लागू करून लोकांचे हक्क कोणी काढून घेतले असा सवाल काँग्रेसला केला.

तसेच राज्यात सर्वात आधी १९७८ साली पक्ष फोडा फोडी झाली असही ते म्हणाले. जनसंघाची स्थापना १९५२ झाली, आणि जनसंघ कसा काय विरोध सविधानाला करेल, अस चंद्रकांत पाटील यांनी वड्ढेटीवार आणि आव्हाडांना विचारलं. यालाच प्रतिवार म्हणून आम्हांला हे सविधान मान्य नाही तसेच त्यांना तिरंगा पण मान्य नाही.हिंदुत्वावादी संघटनांना ते मान्य नव्हत. १९९३ पर्यंत RSS च्या मूख्यालयवर तिरंगा कधीच लावला नाही, असा गंभीर आरोप आव्हाडांनी RSS वर ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) केला. आणि पुन्हा एकदा सभाग्रृहात गदारोळ झाला. मात्र नंतर चंद्रकांत पाटील यांनी चर्चा मूळ मुद्द्यापासून बाजूला जाते हे तालिका अध्यक्षांच्या लक्षात आणून दिले. ही चर्चा रेकॉर्ड वरून काढून टाकण्याची मागणी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तालिका अध्यक्षांना केली. यालाच दुजोरा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील, मूळ विषय सोडून जे काही झालं ते इकडून रेकाँर्डवरुन काडून टाका अशी मागणी केली.

तालिका अध्यक्षांकडून ही मागणी मान्य करत, मूळ मुद्द्यापासून भरकटलेली चर्चा ही रेकॉर्ड वळून काढून टाकण्यात आली. मात्र शेवटी जाता जाता पुन्हा एकदा, चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. आव्हडजी शिवाजी पार्कात स्टेज लावून यावर चर्चा करू, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी केले. याला उत्तर म्हणून तुमचं चॅलेंज मान्य आहे अस म्हणून, चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आव्हान स्वीकारले. मात्र आता ही चर्चा होईल तेव्हा होईल. पण या सगळ्याचं आता, उद्या विधानसभेत काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon Session : अंबादास दानवे यांच्यावर मोठी कारवाई, सभापतींनी केलं निलंबित; प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानं कारवाई, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com