Nanded Crime : भाजप पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Nanded Crime News : भाजप पदाधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime NewsSaam

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडमधील राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्याने हिमायतनगरचे ठाकरे गटाच्या माजी नगरध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या हिमायतनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाचे माजी नराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला आहे.

Navi Mumbai Crime News
Mumbai Crime : घराच्या मागच्या दरवाजातून शिरून गर्लफ्रेंडसोबत केलं भयानक कांड, गुन्हा कबुल करताच बापाने मुलाला पोलिसांत नेलं

नेमकं काय घडलं?

राम सूर्यवंशी आणि कुणाल राठोड यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वाद होता. मंगळवारी रात्री भाजपचे राम सूर्यवंशी आणि ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या पुन्हा वाद झाला. या वादानंतर राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला.

Navi Mumbai Crime News
Jamner Crime : संशयातून प्रियकराने डोक्यात दगड टाकत केली महिलेची हत्या; शहापूर येथील धक्कादायक घटना

कुणाल राठोड यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. राठोड यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाला बेदम मारहाण

कामावरून काढल्याच्या रागावरून एका उद्योजकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाळूज MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंकर पवार, राहुल पवार आणि चार अनोळखी अशी संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. नागेश्वर रमेशराव मुळे यांची खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा लक्ष्मी मिल्क या नावाने कंपनी आहे. या कंपनीत नागेश्वर यांनी दूध विक्री आणि व्यवसायाच्या कामासाठी ४२ जणांना कामावर ठेवले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com