Maharashtra Politics News:  Saamtv
महाराष्ट्र

Satara Politics: 'रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्यानेच घरंदाज नेत्यांच्या पोटात गोळा', शिंदे गटाच्या आमदाराचा घणाघात! शरद पवारांवर टीकास्त्र

ओंकार राजेंद्र कदम

सातारा, ता. १० ऑगस्ट २०२४

एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून घरंदाजांना पोटशूळ उठले आहे, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. कोरेगावमध्ये आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ते बोलत होते.

कोरेगाव शहरात आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

काय म्हणाले महेश शिंदे?

"महाविकास आघाडीतील नेत्यांनी आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केले आहे. माझी मुलगी माझी जबाबदारी, हम दो हमारे दो आता मुलीलाच मुख्यमंत्री करायचे आहे. जर असे झाले तर सर्वजण हेलिकॉप्टरने पळतील," अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता आमदार महेश शिंदे यांनी केली.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवणारे होते. एक रिक्षा चालवणारा, गिरणी कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री झाला, म्हणून हा पोटशूळ आहे, घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे नाहीत असा संभ्रम निर्माण केला जात आहे," असा घणाघातही महेश शिंदे यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali Video: किळसवाणा प्रकार! तुम्ही खात असलेल्या फळांवर लघुशंका? लघुशंका करुन त्याच हाताने फळविक्री

Cancer Moonshot : काय सांगता, जग कॅन्सरमुक्त होणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आखली मोठी योजना, पाहा व्हिडिओ

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT