Parbhani News, Shivsena saam tv
महाराष्ट्र

Parbhani Shivsena Morcha: महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा शिवसैनिकांचा जन आक्राेश, हजाराे परभणीकरांचा माेर्चात सहभाग

यावेळी आंदाेलकांनी महानगरपालिकेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढली.

राजेश काटकर

Shivsena Morcha : महापालिकेच्या ढिसाळ कारभारा विरोधात आज (शुक्रवार) शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. या माेर्चात सेनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो परभणीकर सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

परभणी शहर महानगरपालिकेमध्ये मागील दोन वर्षापासून प्रशासक आहे. मागील दोन वर्षाच्या काळात परभणी शहरातील नागरिकांना नागरी सुविधा तर मिळाल्याच नाहीत पण मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर (trupti sandbhor) यांनी करवाढ मात्र मोठ्या प्रमाणात केली आहे.

नळपट्टी असो की घरपट्टी यामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे शहरांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. रस्ते आहेत की खड्डे आहेत हेच कळायला मार्ग नाही. त्याचबरोबर संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. धुळीमुळे परभणीकरांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे परभणीकरांचा जन आक्रोश मोर्चाच्या रूपाने शिवसेनेचे खासदार संजय जाधव (mp sanjay jadhav) आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील (mla dr. rahul patil) यांनी जिल्हाधिकारी यांच्या समाेर जनतेचे प्रश्न मांडले. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले हाेते. यावेळी आंदाेलकांनी महानगरपालिकेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटात, ३९०० कोटींचा प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टर प्लॅन!

Shocking : पुणे हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून २ तरुणींवर बलात्कार

LIC Jeevan Tarun Plan: दिवसाला फक्त ₹१५० गुंतवा अन् २६ लाख मिळवा; LIC जीवन तरुण पॉलिसी आहे तरी काय?

Lucky Zodiac Sign: आजचा दिवस धार्मिक कार्यांसाठी उत्तम; या चार राशींना मिळणार यश आणि सन्मान

Dates Side Effects : जास्त खजूर खाणे टाळा! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT