Shiv Sena MLA Disqualification Saam Digital
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification: आमदार अपात्रता सुनावणीत नवा ट्वीस्ट! '...तर शिवसेनेचे सर्वच आमदार अपात्र होणार'; ठाकरे गटाकडून मोठा युक्तीवाद

Shivsena Political Crisis: "फुटीर आमदार हे गटाने सुरतला गेले, एकत्रित गुवाहाटीस गेले. तुम्ही प्रतोद बदलला, विधीमंडळ सदस्यांकडून राजकीय पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व क्रिया पक्षाविरुद्ध जाऊन काम केले आहे हे स्पष्ट करतात..." असे देवदत्त कामत म्हणाले.

Gangappa Pujari

सुरज मासूरकर, प्रतिनिधी| ता. १८ डिसेंबर २०२३

Shivsena MLA Disqualification Case:

शिवसेना आमदार अपात्रतेची शेवटच्या टप्प्यातील सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून या सुनावणीत युक्तीवाद केला जाणार आहे. दोन्ही गटाकडून वकिलांची फौज मैदानात उतरवली असून कायद्याचा कस निघत आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद करत शेड्युल १० च्या मुद्द्यावर बोट ठेवत शिंदे गटाची कोंडी केली.

देवदत्त कामत यांचा मोठा युक्तीवाद...

'तुम्ही निवडणूक आयोगाचे (Election Commission) रेकॉर्ड तपासले तर तुम्हाला राजकीय पक्षाची रचना लक्षात येते. तुम्हाला कार्यकारिणी सभा, प्रतिनिधी सभा याबद्दल कुणीही दुमत नोंदवले नसल्याचे साक्षी दरम्यान दिसले. येथे पक्षीय रचना व यंत्रणा आहे. फुटून गेलेले विधीमंडळ सदस्य सांगतात, आम्ही पक्षाचे सदस्यत्व सोडलेले नाही. तुमच्या सर्व कृती पक्षाविरुद्ध असल्याने तुम्ही पक्ष सोडल्याचे स्पष्ट दिसते..' असा महत्वाचा युक्तीवाद देवदत्त कामत यांनी केला.

पक्षविरोधी कार्य केल्याचे स्पष्ट...

'फुटीर आमदार हे गटाने सुरतला गेले, तिथून एकत्रित गुवाहाटीस गेले. तुम्ही प्रतोद बदलला, विधीमंडळ सदस्यांकडून राजकीय पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री निवड, व्हीपचे उल्लंघन या सर्व क्रिया तुम्ही पक्षाविरुद्ध जाऊन काम केले आहे हे स्पष्ट करतात...' असे देवदत्त कामत म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

...तर सर्वच आमदार निलंबित होणार

"इतक्या वर्षांत एकाही कार्यकर्ता किंवा आमदाराने पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत, असे सांगितले नाही.हा सर्व नंतर केलेला बनाव आहे. जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पक्षप्रमुख नव्हते, तर तुमच्या समोर एकच मार्ग होता तो म्हणजे तुम्ही सर्व जण अपात्र ठरता. कारण तुमच्या सर्वांची निवड ही पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे.." असे कामत म्हणाले.

घटनाविरोधी पक्षरचनेचे शिंदे लाभार्थी...

'पक्षाची रचना घटनाविरोधी असल्याचे सांगणे हा शिंदे गटाचा दावा फ्राॅड आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नेता म्हणून निवड उद्धव ठाकरेंनी केली. त्याच घटनाविरोधी पक्षरचनेचे शिंदे हे लाभार्थी आहेत. पक्षरचना घटनाविरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल. कारण, त्याच घटनाविरोधी पक्षनेतृत्वात निवडणुका लढविल्या व ते आमदार झाले. त्यामुळे शिंदेचा हा दावा फ्राॅड आहे...' असा सर्वात मोठा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT