गुहागरमध्ये भास्कर जाधव व ब्राह्मण सहाय्यक संघातील वाद तीव्र.
मुंबईतील मेळाव्यात घनशाम जोशींवर वैयक्तिक टीका.
कुणबी समाजाला सावध राहण्याचा इशारा.
भाजपवर जातीय राजकारणाचा आरोप.
गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच पेटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. मुंबईतील एका मेळाव्यात भास्कर जाधवांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर आणि त्यांच्या गुहागर तालुका अध्यक्षांवर जळजळीत टीका केली. त्यांनी संघाच्या अध्यक्षांविरोधात आक्रमक विधान केले असून, या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोमवारी मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली. 'ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. मला परिणामांची चिंता नाही', असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, 'निवडणुकीदरम्यान, मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात भडकवण्यात आलं होतं. वंचित आघाडीचे नेते अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात माझं नाव गोवलं गेलं. ठाण्यातील राजकीय नेत्याला मी सोडणार नाही', असं भास्कर जाधव म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांच्यावर वैयक्तिक टिका केली. 'घनशाम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर ठीक होतं. पण जोशींनी समाजाच्या नावानं पत्र लिहिलं. त्याचं मला वाईट वाटलं. माझ्याविरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात पत्र द्या. मी गटारात फेकून देईन', अशा शब्दांत ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत भास्कर जाधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांना मी कधीच माफ करणार नाही
'माझ्या आईबद्दल कुणीही अपशब्द वापरला . त्यांना मी कधीच माफ करणार नाही. तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत अंगावर केसेस घेणारा जाधव आहे. पण जेव्हा आईविरूद्ध अपशब्द वापरले, तेव्हा विनय नातूटाळ्या वाजवत होते. त्यांची समोरासमोर लढण्याची हिंमत नाही. म्हणून बदनामी आणि खच्ची करण्याचे काम सुरूये', असं भास्कर जाधव म्हणाले.
मी बाजूला झालो तर, तुम्हाला गिळून टाकतील
गुहागरमधील कुणबी समाजाला जाधवांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 'मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकतील. तुमच्या घरी उद्या पूजा सांगायला कुणी आलं तर, घाबरू नका. मी स्वत: पूजा सांगायला येईन. ते लोक स्वत:च्या घरी पूजा घालतात का विचारा', अशी टिप्पणीही भास्कर जाधव यांनी केली.
भास्कर जाधव वाघाची अवलाद
'माझी त्या दिवशी सभा होती. त्या व्यासपीठावर मी २-४ कार्यकर्त्यांबाबत बोललो. मग तो काय समाजावर विषय गेला का? भाजपच्या लोकांची नावे घेतली. त्यांनी माझ्या विरोधात निषेध पत्र लिहिलं. एक क्लिप मी पाहिली. त्यात भास्करराव ब्राह्मण समाज जागा झाला तर, अवघड होईल असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही दुसऱ्या समाजावर बोलायचं. निवडणूक जवळ आली की तुम्हाला जात दिसते. तुम्हाला वाटतं भास्कर जाधव तुम्हाला घाबरेल. पण ही वाघाची अवलाद आहे', असं भास्कर जाधव म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.