Santosh Bangar News, shivsena, Eknath Shinde latest news, Hingoli News
Santosh Bangar News, shivsena, Eknath Shinde latest news, Hingoli News saam tv
महाराष्ट्र

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला..; संताेष बांगर यांचे हिंगाेलीत जंगी स्वागत

संदीप नांगरे

हिंगाेली : काेण आला रे काेण शिवसेनेचा वाघ आला अशी घाेषणा देत आज (शुक्रवार) हिंगाेलीकरांनी आमदार संताेष बांगर (MLA Santosh Bangar) यांचे परभणी रेल्वे स्थानकापासून हिंगाेली शहरापर्यंत ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. यावेळी आमदार बांगर यांनी जनतेचे आभार मानत सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहावे असे आवाहन जनतेस केले. (Santosh Bangar News latest Marathi news)

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर हिंगोलीच्या (Hingoli) कळमदूरी मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आपल्या मतदारसंघांमध्ये परतले आहेत. (Shivsens latest news)

विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आमदार संतोष बांगर हे काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाले होते. मात्र शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अनेक आमदार हे मुंबईमत अडकून पडले होते.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यापाठीशी राहिलेल्या आमदारांपैकी संतोष बांगर हे आहेत. आपण बाळासाहेबांचे व उद्धवसाहेबांचे शिवसैनिक आहोत ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नसल्याचा पवित्रा घेत आमदार बांगर हे ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिल्याचे पाहायला मिळाले. आज आमदार बांगर हे हिंगोलीत पोहचताच शिवसैनिकांनी त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. परभणी रेल्वे स्थानकावरून हिंगोलीकडे निघालेल्या आमदार संतोष बांगर यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT