Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

MNS Leader Bala Nandgaonkar: बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही दुसऱ्यासोबत युती करतोय तर तुमच्या पोटात का दुखतंय असा सवाल सुद्धा नांदगावकर यांनी केलाय.
MNS Leader Bala Nandgaonkar
MNS Leader Bala NandgaonkarSakal

आवेळ तांदळे,

Shiv Sena Betrayal mns Bala Nandgaonkar: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि भाजपच्या युतीविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. मनसे आणि भाजपची युती होऊ नये म्हणून शिवसेने खोडा घातला होता. शिवसेनेने आमचा विश्वासघात केला होता, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केलीय.

राज ठाकरे हे कोणाचे मुलं आपल्या खांद्यावर फिरवणार नाही, असं म्हटलं होतं, परंतु आता स्वत: राज ठाकरे यांनी इतर पोरांना कडेवर घेतल्याची टीका ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या टीकेला उत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी हा गौप्यस्फोट केलाय. वर्ष २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजप युती तुटली, तेव्हा मनसे आणि भाजप अशी युती होणार होती. ही युती होऊ नये म्हणून शिवसेनेने आमचा विश्वासघात केला.

याबद्दल अनिल देसाई जे आत्ताचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना विचारा, असेदेखील बाळा नांदगावकर म्हणाले. राज ठाकरे यांना फोन करून कोणी एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. एबी फॉर्म वाटण्याच्या दिवसापर्यंत आम्हाला जाणीवपूर्वक राखडवून ठेवले होते, अशी आठवण बाळा नांदगावकर यांनी करून दिली. इतकेच नाही तर २०१७ मध्ये देखील शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यानंतर आमचे ६ नगरसेवक चोरून पुन्हा विश्वासघात केल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला. आम्हाला वाटलं की राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने एखादी चांगली घटना घडत असेल तर होऊ दे. पण तुम्ही आम्हाला फसवलं, आमचा विश्वासघात केला.

आणि आता आम्ही कोणासोबत जातो तर तुमच्या पोटात का दुखतं? २०१७ मध्ये तुम्हीच आला होता ना आमच्याकडे? त्यामुळे माहिती घेऊन बोला विश्वासघाती कोण आहे ? असा सवाल नांदगांवकर यांनी केलाय.

या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत.एवढी वर्ष तुम्ही सोबत होतात सत्तेचा मलिदा तुम्ही खाल्लात. आम्ही सत्तेसाठी कोणाकडे गेलो नाही आम्ही कोणालाही कडेवर घेतले नाही. आता तुम्ही कडेवर घेतलात की तुम्ही त्यांच्या कडेवर बसलात? आता आमची भूमिका ठाम आहे. ती आम्ही घेऊन जात आहोत असल्याचं बाळा नांदगावकर म्हणालेत.

बऱ्याच उमेदवारांकडून राज ठाकरेंच्या सभेची मागणी होतेय. पण राज ठाकरे यांनी अजून विचार केलेला नाहीये. सध्या राज ठाकरेंच्या दोन सभा नक्की झाल्यात. ४ मेला कणकवली आणि १२ मेला कल्याण अशा दोन सभा नक्की झाल्यात. मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी उत्तम प्रकारचे काम केले आहे. त्यानंतर ही दुसऱ्या पक्षात मंत्री झाले त्यांनी चांगलं काम केल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हणाले.

MNS Leader Bala Nandgaonkar
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com