सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडे 'हे' दोन पर्याय, उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार?

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी सूचना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचे सूत्रांकडून समजते.
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra GovernmentSaam Tv
Published On

सातारा : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार काेसळणार हे निश्चित मानले जात आहे. राजकीय उलथापालथीच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेचे ३७ हून अधिक आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचल्याची माहिती समजत आहे. महाविकास आघाडी सरकारसमोरील राजकीय पेचप्रसंगाला कसे सामोरे जायचे, यावर काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेना (shivsena) सातत्याने मंथन करत आहे. परंतु कोणताही तोडगा निघताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची खुर्ची जाणार असे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर कोणते राजकीय पर्याय उरले आहेत? हे जाणून घेऊ या. (maharashtra politics news)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री त्यांचा शासकीय बंगला 'वर्षा' साेडल्यानंतर तेा 'मातोश्री' (त्यांच्या घरी) येथे पोहोचले. ठाकरे यांनी तूर्तास मुख्यमंत्रीपद सोडले नसून, बंडखोरांनी पुढे येऊन चर्चा केल्यास आपण त्यासाठी तयार असल्याचे संकेत कालच त्यांनी समाज माध्यमातून दिले. असे असतानाही शिवसेनेतील बंडखाेरी थांबत नसल्याचे चित्र आजही दिसून आले. त्यामुळे दूसरीकडे एकनाथ शिंदे (eknath latest news) गटाची ताकद वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव यांच्या खूल्या ऑफरनंतरही शिंदे गट त्यांच्या भुमिकेवर ठाम असल्याचे दिसते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
Shivsena : 'कॅरम खेळण्यापुरते पण शिल्लक राहणार नाहीत असं दिसतंय'

शिंदे यांना मुख्यमंत्री करून सत्ता वाचवता येईल

शिवसेनेचे आमदार ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसमोर पक्ष आणि सत्ता वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनीही बुधवारी भावनिक संदेश देत आपल्याच लोकांना मुख्यमंत्रीपदावर बघायचे नसेल तर आपण त्यासाठी तयार आहोत, असा भावनिक संदेश दिला. मात्र, मुख्यमंत्री फक्त शिवसैनिकच हवा असेही ठाकरे यांनी नमूद केले. सत्ता वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री पदावरुन पायउतार हाेण्यास तयार असून कोणत्याही शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी भुमिका त्यांनी मांडली.

शिवसेनेच्या आमदारांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केली आहे, त्यावरून त्यांच्या खुर्चीस धाेका आहे हे निश्चित. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसविणे हा पर्याय ठाकरे यांच्यासमोर आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी सूचना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे असेही समजते. अशा परिस्थितीत सरकार आणि शिवसेनेला या माेठ्या राजकीय संकटातून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे पाऊल उचलतील का? तसे झाले तर महाविकास आघाडी (mva) आणि शिवसेना यांच्यातील हे राजकीय संकट संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
भारतीय क्रिकेटपटूने अचानक केली निवृत्तीची घाेषणा; टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनल खेळली हाेती

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ट्विट करून शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती अनैसर्गिक असल्याचे सांगत यातून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. शिंदे म्हणाले राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, कारण त्यांची विचारधारा शिवसेनेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे ज्या प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत आक्रमक होत भाजपसोबत सरकार स्थापनेचा पर्याय देत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर केवळ मुख्यमंत्री पद नव्हे तर महाविकास आघाडीपासून वेगळे होण्याचा पर्याय शोधावा लागणार आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
ठाकरे सरकार संकटात! भाजप हा जादुई आकडा गाठेल ? जागांचे गणित समजून घ्या

भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा पर्याय

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे ज्या प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीशी संबंध तोडण्याबाबत कठोर भूमिका घेत आहेत आणि पक्षाचे सर्व आमदार त्यांच्या पाठिशी उभे राहिलेले दिसत आहेत. अशा स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडून भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करणे हा उद्धव ठाकरेंसमोर दुसरा पर्याय आहे, कारण शिवसेनेतील बंडखोरीनंतर त्यांची खुर्ची जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भाजपशी हातमिळवणी केल्यास सत्ता निश्चितच टिकून राहील. एकनाथ शिंदे सातत्याने भाजपसोबत सरकार स्थापन करण्याबाबत आग्रही दिसत आहेत.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांचा मोठा पल्ला गाठला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला होता. त्यावर भाजपचे एकमत नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपशी संबंध तोडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री झाले. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी भाजपऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले असेल, पण अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडली तर त्यांचा पराभव मानला जाणार नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार झाले, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपेक्षाही उद्धव यांच्यासमोर पक्ष वाचवण्याचे आव्हान आहे. शिवसेनेच्या आमदारांपासून ते खासदारांपर्यंत बंडखोरी झाली आहे.

त्याचवेळी शिवसेनेला भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससमवेत ते शक्य नाही, कारण दोघेही एकमेकांचे वैचारिक विरोधक राहिले आहेत. शिवसेना आणि भाजप हे कट्टर हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत, त्यामुळे ते २५ वर्षे एकत्र राहिले. अशा स्थितीत भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत राहून पक्ष जिवंत ठेवण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंसमोर आहे. उद्धव कोणते राजकीय पाऊल उचलतात हे पाहणे बाकी आहे.

Edited By : Siddharth Latkar

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल; पाच वर्षांची बंदी घालण्याची मागणी
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
साता-याच्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उदयनराजेंची दिल्लीतून प्रतिक्रिया, म्हणाले...!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com