भारतीय क्रिकेटपटूने अचानक केली निवृत्तीची घाेषणा; टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनल खेळली हाेती

आज रुमेली धर हिने निवृत्तीची घाेषणा केली.
Rumeli Dhar, Rumeli Dhar Retirement, Indian Women's Cricket Team
Rumeli Dhar, Rumeli Dhar Retirement, Indian Women's Cricket TeamSaam Tv

नवी दिल्ली : या महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघातून (Indian Woman Cricket Team) मिताली राज (Mithali Raj) निवृत्त झाली हाेती. तिच्या पाठाेपाठ आज रुमेली धर (Rumeli Dhar) हिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून (cricket) निवृत्त हाेत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या 15 वर्षात क्रिकेट खेळात भारतीय संघासाठी उत्तम खेळाचे (sports) प्रदर्शन घडविणा-या रुमेलीने (rumeli dhar latest marathi news) आपल्या निवृत्तीची घाेषणा समाज माध्यमातून केली. (rumeli dhar announces retirement from all formats of the game)

धरने सन 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. रुमेली धरने भारतासाठी चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने सन 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी- 20 विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच सन 2012 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 सामन्यात भारतासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत सलामी देण्याची दुर्मिळ कामगिरी तिने केली हाेती.

Rumeli Dhar, Rumeli Dhar Retirement, Indian Women's Cricket Team
व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा

रुमेलीने 29.50 च्या सरासरीने 236 धावा केल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये 21.75 च्या सरासरीने आठ बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने १९.६१ च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह ९६१ धावा केल्या आहेत तर २७.३८ च्या सरासरीने ६३ बळी घेतले आहेत. टी -20 क्रिकेटमध्ये, रुमेलीने 18.71 च्या सरासरीने (नाबाद 66 च्या सर्वोत्तम धावांसह) 131 धावा केल्या आणि 23.30 च्या सरासरीने 13 बळी घेतले.

Rumeli Dhar, Rumeli Dhar Retirement, Indian Women's Cricket Team
Ranji Trophy Final : शाॅ, जयस्वाल जाेडीने केली मुंबईची धमाकेदार सुरुवात; मध्यप्रदेशचे गाेलंदाज ढेपाळले

निवृत्तीच्या पोस्टमध्ये रुमेलीने "सर्व चढ-उतारात माझ्याबराेबर राहिलेल्या प्रत्येकाचे आभार मानते ज्यांनी माझ्यावर, माझ्या खेळावर प्रेम केले, जेव्हा मला सर्वात जास्त गरज होती तेव्हा मला पाठबळ दिले, माझ्या सर्वात वाईट वेळी मला आनंद दिला. , माझ्याबरोबर हसले, गरज पडेल तेव्हा मला फटकारले. या सर्वांचे मी आभारी आहे.

"आज मी जे काही आहे त्याबद्दल मी तुम्हा प्रत्येकाचे ऋणी आहे. आज, माझ्या मनात असलेली भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. माझ्याबराेबर राहिल्याबद्दल.. आणि इतकी वर्षे इतके प्रेम दिल्याबद्दल फक्त प्रत्येकाचे आभार!

Edited By : Siddharth Latkar

Rumeli Dhar, Rumeli Dhar Retirement, Indian Women's Cricket Team
महिला विश्वकरंडक हाॅकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; फलटणच्या अक्षता ढेकळेचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com