shivpada villagers demands basic infrastructure in bhogapur nandurbar Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar: लोकप्रतिनिधी फक्त मतदान मागण्यासाठी येतात ! रस्ते, पाणी, घरकुलापासून शिव पाड्यातील ग्रामस्थ वंचित

गेल्या 75 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून या नागरिकांचा या ठिकाणी अधिवास आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar News :

लोकप्रतिनिधी फक्त मतदान घेण्यासाठी येत असल्याचा आराेप शहादा तालुक्यातील भाेगपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा शिव पाड्यातील रहिवासी करु लागले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी, घरकुल आणि विविध शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याने गावकरी संतप्त झाले आहे. साम टीव्हीशी बाेलताना गावक-यांनी सरकारने तात्काळ सुविधा द्याव्यात अशी मागणी केली. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांना आजपर्यंत पाणी, विद्युत पुरवठा नसल्याच्या समस्या आहेत. शहादा तालुक्यातील भाेगपूर येथील शिवपाडा या वसाहतीत जवळपास 200 लोक राहतात. गेल्या 75 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून या नागरिकांचा या ठिकाणी अधिवास आहे.

परंतु जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी नागरिकांना वीज, पिण्याचे पाणी, घरकुल यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी ही अनेक अडचणी येतात. याबाबत साम टीव्हीशी बाेलताना ग्रामस्थ म्हणाले लोकप्रतिनिधी आमच्या वसाहतीत फक्त मतदान मागण्यासाठी येतात. आम्हांला दिलेले आश्वासन पूर्ण करत नाहीत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा होत असतानाही आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बैलपोळा सणाला काळाचा घाला; ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू, खाटेवरून मृतदेह गावात आणला

Maharashtra Live News Update: अमित ठकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट, नेमकं 'राज'कारण काय?

Tik Tok Update: भारत-चीनची हातमिळवणी, टिकटॉक भारतात पुन्हा सुरु होणार?

Mangi Tungi : नाशिकजवळची मांगी-तुंगी टेकडी; शांततेचा अनुभव

Karde Beach : कोकणच्या सौंदर्यात भर घालणारा कर्दे बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT