KC Padvi: पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करा : आमदार पाडवी

सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहे मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे असेही पाडवी यांनी नमूद केले.
Mla KC Padvi
Mla KC Padvisaam tv
Published On

- सागर निकवडे

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे चारा खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिकांप्रमाणे खराब चाऱ्याचा ही पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सरकारने दिलासा द्यावा. शासकीय स्तरावरून चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे मत माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी (kc padvi) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

के.सी.पाडवी म्हणाले गेल्या आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारा पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जगवावीत कशी असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहे मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे असेही पाडवी यांनी नमूद केले.

Mla KC Padvi
Success Story: दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी; करमाळ्यातील इंजिनिअर युवकानं करुन दाखवलं

ते म्हणाले पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी. त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे अशी मागणी पाडवी यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

Edited By : Siddharth Latkar

Mla KC Padvi
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com