Fire in Shivajinagar, Nanded
Fire in Shivajinagar, Nanded saam tv
महाराष्ट्र

Fire: शिवाजीनगर पाेलीस ठाणे परिसरात लागली आग; चार CAR जळून खाक

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) पोलिसांनी विविध कारवायात जप्त केलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत (fire) तीन चार कार जळून खाक झाली आहेत. ही घटना आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (shivajinagar police station) परिसरात घडली. (nanded fire latest marathi news)

शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेली आणि चोरीची वाहने पाेलीस ठाण्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ठेवली होती. यात दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश आहे. आज दुपारी उन्हामुळे चार चाकी वाहनातील बॅटरी गरम होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलास (fire brigade) तातडीने बाेलाविण्यात आले. अग्निशमन दलाने भीषण स्वरुपाची आग विझविली. त्यामुळे इतर वाहनांपर्यंत आग पाेहचू शकली नाही. या आगीत तीन ते चार वाहनं जळून खाक झाली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Voting Live Update: जनतेचा सर्व्हे आमच्याकडे, सरकारी सर्व्हे त्यांच्याकडे : मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Lok Sabha Election Exit Poll 2024 Result Live: लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Pune Porsche Crash : पुणे पोर्शे अपघात प्रकरण : माझा मुलगाच कार चालवत होता; आई-वडिलांची पोलीस चौकशीत कबुली

Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवू नका चप्पल स्टॅन्ड, नात्यावर होईल परिणाम

A Valentine Day Film : अभिमानास्पद…. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’चा मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकला, Video Viral

SCROLL FOR NEXT