बुलडाणा : केंद्र सरकारने हमी भावाने कांद्याची (onion) खरेदी करावी व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटना (SWABHIMANI SHETKARI SANGHATANA) रस्त्यावर उतरेल असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. (ravikant tupkar latest marathi news)
रवीकांत तपुकर म्हणाले कांद्याला भाव मिळत नसल्याने (Onion Price Drop) शेगाव (shegoan) येथील शेतकऱ्याने सुमारे दाेनशे क्विंटल कांदा मोफत वाटला. बुलढाणा (buldhana) जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने हमी भावाने कांद्याची खरेदी करावी व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आम्ही उतरु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.